English

पुढील मुद्द्यांच्या आधारे 'माहितीपत्रकाची गरज' स्पष्ट करा: माहितीपत्रक म्हणजे - विविध क्षेत्रांची नावे व त्यातील गरज - लोकमत आकर्षित - वेगळेपणा व वैशिष्ट्ये - ग्राहकाचा फायदा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

पुढील मुद्द्यांच्या आधारे 'माहितीपत्रकाची गरज' स्पष्ट करा:

माहितीपत्रक म्हणजे - विविध क्षेत्रांची नावे व त्यातील गरज - लोकमत आकर्षित - वेगळेपणा व वैशिष्ट्ये - ग्राहकाचा फायदा.

Explain
Advertisements

Solution

माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते. आगदी फलफळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यांपासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासतेच. दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, किरणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशन्स, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे, दूधदुभते, खाद्यपदार्थ इत्यादींसाठी माहितीपत्रकाचे पाहावयास मिळतात.

नाट्यगृहे, सिनेमागृहे, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडासंस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, एलआयसी, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचतगट इत्यादी ठिकाणी माहितीपत्रकाची गरज असते.

कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यांसारखिच इतरही अनेकानेक क्षेत्रे आहेत. जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा, या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची गरज हमखास असते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×