English

व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाची वैशिष्ट्ये लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाची वैशिष्ट्ये लिहा.

Very Long Answer
Advertisements

Solution

व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखात एखाद्या क्षेत्रात देदीप्यमान कार्य केलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा आढावा घेतला जातो. विशिष्ट क्षेत्रातील यश, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष, प्रयत्नांची पराकाष्ठा, अडचणींचा केलेला सामना, महत्त्वपूर्ण कृती, उपक्रम, विक्रम या संदर्भातील लेखन या वृत्तलेखात करणे आवश्यक असते.

व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखात वाचकांपुढे व्यक्‍तीच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवणे आवश्यक असते. अशा वेळी त्या व्यक्तीसंबंधी पूर्वी झालेले लेखन, चरित्र, आत्मचरित्र, सोबत काम केलेल्या व्यक्‍ती, स्नेहीजन यांच्या मुलाखती अशी विस्तृत माहिती मिळवणे उपयुक्त ठरते.

या प्रकारच्या लेखनात व्यक्‍तीची परिचयात्मक माहिती लिहून चालत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीचे विचार, भूमिका, दृष्टिकोन, खास शेली, सवयी इत्यादी बाबींचा सखोल परामर्श घेणे महत्त्वपूर्ण ठरते. व्यक्तिगत जीवनातील भावनिक स्पर्श हे या वृत्तलेखाचे वैशिष्ट्य म्हणता येते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×