Advertisements
Advertisements
Question
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
जोडणारे दुवे
Short/Brief Note
Advertisements
Solution
काही सजीवांत अशी शारीरिक लक्षणे असतात की, ती लक्षणे दोन वेगळ्या गटांतील सजीवांत आढळून येतात. दोन वेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदा.,
- पेरीपॅटस:
पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. ॲनेलिडा व संधिपाद या दोन्ही अपृष्ठवंशीय प्राणी संघाची वैशिष्ट्ये हा प्राणी दर्शवतो. ॲनेलिडा किंवा वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव आणि संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था या प्राण्यात आढळते. - डकबिल प्लॅटिपस:
हा प्राणी सरिसृप आणि सस्तन वर्ग यांना जोडणारा दुवा आहे. सरिसृप प्राण्यांप्रमाणे हा अंडी घालतो; परंतु सस्तन प्राण्यांप्रमाणे याच्यात दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात. - लंगफिश:
हा मत्स्य आणि उभयचर या वर्गांना जोडणारा दुवा आहे. तो मासा असूनही फुप्फुसांद्वारे श्वसन करतो. - या जोडणाऱ्या दुव्यांवरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज येतो.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
भ्रूणविज्ञान
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
खालील आकृतीतील भागांना नावे द्या.

आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
खालील आकृती पूर्ण करा.

गटातील वेगळा शब्द ओळखा:
