Advertisements
Advertisements
Question
पोर्तुगीज - मराठा संघर्षाविषयी माहिती लिहा.
Very Long Answer
Advertisements
Solution
- शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संपर्क आला.
- मराठ्यांनी आदिलशाहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला असता पोर्तुगीजांनी तेथील किल्लेदाराला दारूगोळा पुरवला.
- पोर्तुगीजांच्या धर्मांतराला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे स्थानिक लोक असंतृष्ट झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेश प्रदेशावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला.
- मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या दंडाराजापुरी या परिसराला वेढा घातला तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य व दारूगोळा पुरवला.
- आदिलशाही-मराठे संघर्षात पोर्तुगीज तटस्थ असल्याचे भासवून ते आदिलशहाला मदत करत असत.
- रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे-पोर्तुगीज यांच्यात संघर्ष कायमच राहिला.
- गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने चालवलेली धर्मांतरे, समुद्री व्यापारातील लुटालूट या कारणांमुळे त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. फोंड्याच्या वेढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केले.
- छत्रपती संभाजी महाराजांनी रेवदंड्यावर आक्रमण केले. त्याच्या प्रत्युत्तरादाखल पोर्तुगीजांनी फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. अडथळा दूर करून मराठा सैन्याने गोव्यावर स्वारी केली. परंतु, दक्षिण कोकणावर मुघलांनी आक्रमण केल्याची बातमी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी अर्धवट मोहीम सोडून मुघलांविरुद्ध प्रयाण केले.
- पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे आणि पोर्तुगीज यांचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला.
- थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांच्याकडे पोर्तुगीजविरोधी मोहिमेची सूत्रे देण्यात आली. युद्धाच्या सुरुवातीलाच चिमाजीअप्पांनी ठाणे, साष्टी बेट आणि वसई बेटावरील किल्ले जिंकले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
