Advertisements
Advertisements
Question
गोवा मुक्ति लढ्याविषयी माहिती लिहा.
Very Long Answer
Advertisements
Solution
भारतामध्ये पोर्तुगीजांनी पुढील ठिकाणी वसाहती स्थापन केल्या:
- भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात पोर्तुगीजांचे गोवा, दमण आणि दीव, तसेच दादरा-नगर हवेली या प्रदेशांवर वर्चस्व होते. त्यांनी हे प्रदेश सोडण्यास नकार दिल्यामुळे गोवा मुक्ती चळवळीचा उदय झाला.
- १९२८ मध्ये मुंबई येथे ‘गोवा काँग्रेस कमिटी’ ची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ. टी. बी. कुन्हा होते.
- १९३९ मध्ये गोव्यात ‘छोडो गोवा’ या घोषणेची पत्रके लावण्यात आली. संयुक्त आघाडीचे अध्यक्ष फ्रान्सिस मस्कारन्हास यांनी गोव्यात भारतीय राष्ट्रध्वज फडकावला.
- १९४६ मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. अनेक लोकांना अटक करण्यात आली.
- पोर्तुगालमधील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर डॉ. कुन्हा यांनी ‘आझाद गोवा’ आणि ‘स्वातंत्र गोवा’ ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.
- १९५४ मध्ये पुणे येथे ‘गोवा विमोचन सहाय्यक समिती’ ची स्थापना करण्यात आली.
- सेनापती बापट आणि एन. जी. गोरे (नानासाहेब गोरे) यांच्या नेतृत्वाखालील स्वयंसेवकांनी पणजी किल्ल्यावर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला.
- आचार्य प्र. के. अत्रे यांनी त्यांच्या ‘मराठा’ या दैनिकाच्या माध्यमातून या चळवळीला पाठिंबा दिला. आझाद गोमंतक दलाने मोहन रानडे यांच्या साहाय्याने पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरू केला.
- गोव्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूने निर्माण झालेल्या प्रबळ जनमतामुळे पंडित जवाहरलाल नेहर यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेला ‘ऑपरेशन विजय’ असे सांकेतिक नाव देण्यात आले.
- ही मोहीम पूर्ण करण्यासाठी भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला. स्थानिक लोकांनीही सैन्याला मदत केली. पोर्तुगीजांनी पेरलेल्या भूसुरुंगांची ठिकाणे सैन्याला दाखविण्यात आली. अवघ्या दोन दिवसांत पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली.
१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा भारतीय प्रजासत्ताकाचा भाग बनला.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
