English

प्लॅस्टिकच्या 1 सेमी त्रिज्येच्या लहान गोळ्या वितळवून वृत्तचिती आकाराची नळी तयार केली. नळीची जाडी 2 सेमी उंची 90 सेमी व बाह्यत्रिज्या 30 सेमी असेल तर त्या नळीसाठी किती गोळ्या वितळवल्या असतील? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

प्लॅस्टिकच्या 1 सेमी त्रिज्येच्या लहान गोळ्या वितळवून वृत्तचिती आकाराची नळी तयार केली. नळीची जाडी 2 सेमी उंची 90 सेमी व बाह्यत्रिज्या 30 सेमी असेल तर त्या नळीसाठी किती गोळ्या वितळवल्या असतील?

Sum
Advertisements

Solution

 

दिलेले: वृत्तचिती आकाराच्या नळीसाठी,

उंची (h) = 90 सेमी, बाह्यत्रिज्या (R) = 30 सेमी,

जाडी = 2 सेमी,

प्लॅस्टिकच्या गोळीसाठी,

त्रिज्या (r1) = 1 सेमी

शोधा: वितळवलेल्या गोळ्यांची संख्या 

उकल:

नळीची आतील त्रिज्या (r)

= बाह्यत्रिज्या - नळीची जाडी 

= 30 – 2

= 28 सेमी

नळीसाठी लागणाऱ्या गोळ्यांचे एकूण घनफळ = नळीचे बाह्य घनफळ - आतील पोकळ भागाचे घनफळ

= πR2h – πr2h

= πh(R2 - r2)

= π × 90(302 - 282

= π × 90 (30 + 28) (30 – 28) ......[∵ a2 – b2 = (a + b)(a – b)]

= 90 × 58 × 2π सेमी

एका प्लॅस्टिकच्या गोळीचे घनफळ = `4/3pir_1^3`

= `4/3pi xx 1^3`

= `4/3pi` सेमी

वितळवाव्या लागणाऱ्या गोळ्यांची संख्या = `(नळीसाठी लागणाऱ्या प्लॅस्टिकचे घनफळ)/(एका गोळीचे घनफळ)`

= `(90 xx 58 xx 2pi)/(4/3pi)`

= `(90 xx 58 xx 2 xx 3)/4`

= 7830

∴ नळीसाठी 7830 गोळ्या वितळवल्या असतील.  

shaalaa.com
वृत्तचिती पृष्ठफळ
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: महत्त्वमापन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [Page 161]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 महत्त्वमापन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q 3. | Page 161

RELATED QUESTIONS

एका लंबवृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 5 सेमी व उंची 40 सेमी असेल तर तिचे एकूण पृष्ठफळ काढा.


शेजारील चित्रात दिलेल्या माहितीवरून; अर्धगोल, वृत्तचिती व शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढा.

 


5 सेमी त्रिज्येच्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 440 सेमी2 असल्यास त्या वृत्तचितीची उंची किती? 


एका रोलरचा व्यास 120 सेमी आणि लांबी 84 सेमी आहे. एक मैदान एकदा सपाट करण्यासाठी रोलरचे 200 फेरे पूर्ण होतात. तर 10 रुपये प्रति चौरस मीटर या दराने ते मैदान सपाट करण्याचा एकूण खर्च काढा.


12 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यात 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेले आहे.त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेमीने वाढते, तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा.


एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20 सेमी व उंची 13 सेमी आहे तर त्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (π = 3.14 घ्या.)


वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 1980 सेमी2 असून तळाची त्रिज्या 15 सेमी असल्यास त्या वृत्तचितीची उंची काढा. (π = `22/7` घ्या.)


0.9 मी व्यास व 1.4 मी लांबी असणाऱ्या रोड रोलरच्या 500 फेऱ्यांमध्ये सपाट केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ किती? (π = `22/7`)


वर्तुळाकार विहिरीचा आतील व्यास 4.20 मीटर आहे. विहिरीची खोली 10 मीटर आहे. तर त्याचे आतील वक्रपृष्ठफळ किती? विहिरीच्या आतील वक्रपृष्ठाला गिलावा करण्यासाठी प्रतिचौमी 52 रुपये दराने किती खर्च येईल?


एका रोडरोलरची लांबी 2.1 मीटर असून त्याचा व्यास 1.4 मीटर आहे. एका मैदानाचे सपाटीकरण करताना रोलरचे 500 फेरे पूर्ण होतात, तर रोलरने किती चौमी मैदान सपाट होईल? सपाटीकरणाचा दर प्रति चौमी 7 रुपये दराने किती खर्च येईल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×