Advertisements
Advertisements
Question
पावसाच्या पाण्याचा नमुना मिळवा. त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाका. त्याचा सामू मोजा. पावसाच्या पाण्याचे स्वरूप काय आहे ते सांगून त्याचा सजीवसृष्टीवर काय परिणाम होतो ते लिहा.
Advertisements
Solution
वैश्विक दर्शकाचे काही थेंब पावसाच्या पाण्याच्या नमुन्यात टाकले असता त्याचा pH 7 पेक्षा थोडा कमी म्हणचे 6.5 आढळतो, म्हणून पावसाचे पाणी आम्लधर्मी आहे. या पाण्यात सूक्ष्मपोषक पौष्टिक घटक आढळतात. हवेतील नायट्रोजन या पाण्यात विरघळल्यामुळे नायट्रेटस् तयार होतात. त्यामुळे सजीव सृष्टीला विशेषत: वनस्पती, रोपटी यांना नैसर्गिक खते मिळण्यास मदत होते. मात्र पावसाचे पाणी आम्लधर्मी असल्याने जेव्हा नदीतून वाहते तेव्हा नदीच्या पाण्याचा pH कमी होतो. अशा वेळी जलचर प्राण्यांचे जगणे कठीण होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
सोडिअम हायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनॉल्फ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकले.
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिळवून हलवले.
