Advertisements
Advertisements
Question
‘नर्स ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करायची धडपड करते,’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
Advertisements
Solution
अनूच्या मतानुसार डॉक्टरांपेक्षा नर्सचे महत्त्व अधिक असते. तिच्यावरची जबाबदारीही मोठी असते. आजारी माणसाची सेवा नर्स अधिक जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने करते. डॉक्टरांच्या व्यवसायात ज्ञानाला अधिक महत्त्व असते; पण नर्सच्या कार्यात भावना आणि संवेदनशीलतेचा वाटा मोठा असतो. डॉक्टरांचा स्टेथॉस्कोप रुग्णाच्या छातीपर्यंत पोहोचून आजाराचे निदान करतो; परंतु नर्सचा स्पर्श रुग्णाच्या हृदयापर्यंत पोहोचतो.
डॉक्टरांनी रोग ओळखला की त्यांचे काम पूर्ण होते; पण नर्सला रुग्णाची मानसिक अवस्था समजून घ्यावी लागते. तिला केवळ आजाराची नव्हे, तर आजारी माणसाची माहिती महत्त्वाची वाटते. रुग्णाचे मन जाणून घेणे, त्याच्या सवयी-गैरसवयी समजून घेणे, त्याला धीर देणे, त्याची मानसिक ताकद वाढवणे आणि औषधांची वेळ पाळणे अशी अनेक कामे नर्स करते. रोग औषधांमुळे बरा होतो; पण रुग्णाला परिस्थितीतून उभारी देणे आणि आजाराशी लढण्याची शक्ती देणे अधिक आवश्यक असते. डॉक्टर फक्त ताप मोजून आपले काम आटोपतात; परंतु नर्सला रुग्णाचा शारीरिक ताप आणि मानसिक ताण या दोन्हींचे निरसन करावे लागते.
