English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

‘मकबरा आणि लेखक’ यांच्यातील संभाषणाचे संवादलेखन करून सादरीकरण करा.

Advertisements
Advertisements

Question

‘मकबरा आणि लेखक’ यांच्यातील संभाषणाचे संवादलेखन करून सादरीकरण करा.

Activity
Advertisements

Solution

मकबरा: काय रे? चकवलंस ना आज मला?
लेखक: तुला आज भेटणं शक्य नव्हतं! खूप पाऊस होता.
मकबरा: थोडा वेळ थांबला असतास, तर पाऊस गेला असता. पुलावरचं पाणी कमी झालं असतं. मग माझ्या वाटेनं विद्यापीठाला नसतं का जाता आलं?
लेखक: हो. पण मला वेळेत विद्यापीठात जायचं होतं ना!
मकबरा: एक दिवस उशीर झाला तर काय झालं? आपण भेटलो तरी असतो ना!
लेखक: होय. तेही खरंच, पण...
मकबरा: पण नाही नि बिन नाही. तुला मला चुकवायचंच होतं.
लेखक: तसं नाही. तुला भेटायला आवडतं मला.
मकबरा: म्हणून निघून गेलास दुसऱ्या वाटेनं! तुला हल्ली कंटाळा येतो का माझा?
लेखक: अजिबात नाही.
मकबरा: मला कालची सगळी गोष्ट सांगायची होती. पण तू अगदी ‘आग्ग्राहून सुटका’ करून घेतलीस जयसिंगपुऱ्याच्या वाटेनं?..
(मकबरा खो-खो करून हसू लागला. लेखकही मनसोक्त हसला.)
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: मकबरा - माझ्या मनातला! - कृती [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 मकबरा - माझ्या मनातला!
कृती | Q (३) | Page 17
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×