Advertisements
Advertisements
प्रश्न
‘मकबरा आणि लेखक’ यांच्यातील संभाषणाचे संवादलेखन करून सादरीकरण करा.
कृति
Advertisements
उत्तर
| मकबरा: | काय रे? चकवलंस ना आज मला? |
| लेखक: | तुला आज भेटणं शक्य नव्हतं! खूप पाऊस होता. |
| मकबरा: | थोडा वेळ थांबला असतास, तर पाऊस गेला असता. पुलावरचं पाणी कमी झालं असतं. मग माझ्या वाटेनं विद्यापीठाला नसतं का जाता आलं? |
| लेखक: | हो. पण मला वेळेत विद्यापीठात जायचं होतं ना! |
| मकबरा: | एक दिवस उशीर झाला तर काय झालं? आपण भेटलो तरी असतो ना! |
| लेखक: | होय. तेही खरंच, पण... |
| मकबरा: | पण नाही नि बिन नाही. तुला मला चुकवायचंच होतं. |
| लेखक: | तसं नाही. तुला भेटायला आवडतं मला. |
| मकबरा: | म्हणून निघून गेलास दुसऱ्या वाटेनं! तुला हल्ली कंटाळा येतो का माझा? |
| लेखक: | अजिबात नाही. |
| मकबरा: | मला कालची सगळी गोष्ट सांगायची होती. पण तू अगदी ‘आग्ग्राहून सुटका’ करून घेतलीस जयसिंगपुऱ्याच्या वाटेनं?.. |
| (मकबरा खो-खो करून हसू लागला. लेखकही मनसोक्त हसला.) | |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
