Advertisements
Advertisements
Question
'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे,' हे स्पष्ट करा.
Advertisements
Solution
प्राणसई घनावळीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मैत्रिणीची भावावस्था कवयित्री इंदिरा संत यांनी 'प्राणसई' या कवितेत भावपूर्ण शब्दकळेत साकार केली आहे.
कवयित्री पावसाळी ढगांना, म्हणजे मेघमालेला 'प्राणसखी' असे संबोधतात. ही घनावळ कोठे गुंतून पडली आहे, ती माझ्या सादेला प्रतिसाद का देत नाही, म्हणून कवयित्री अस्वस्थ आहेत. मी पाखरांच्या हाती तुला निरोप धाडला आहे, आपली मैत्री आठवून तू धावत ये, अशी कळकळीची विनवणी कवयित्री प्राणसईला करत आहेत. एखादया सखीला मनातले गूंज सांगावे, तसे पावसाअभावी झालेल्या परिसराचे व घरादाराचे वर्णन कवयित्री घनावळीला करत आहेत. तू आलीस की दारात उभी राहून मी तुझ्याशी गुजगोष्टी करीन, माझ्या सख्याचे शेतामधल्या कष्टाचे कौतुक तुला सांगेन, असे हळवे आश्वासन त्या प्राणसईला आहेत. या सर्व वर्णनावरून कवयित्री व प्राणसई यांच्यातील प्रेममय ऋणानुबंध व मैत्रीचे नाते स्पष्ट होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चौकटी पूर्ण करा.
कवयित्रीने जिला विनंती केली ती - _________
चौकटी पूर्ण करा.
कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी - _________.
चौकटी पूर्ण करा.
शेतात रमणारी व्यक्ती - _________.
कारण लिहा.
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण ..........
कारण लिहा.
बाळांची तोंडे कोमेजली; कारण .............
कृती करा.
कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा :
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा:
ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :
विहिरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग
खालील तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा.
| प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी | प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळी | प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी | मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी |
खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
‘कां ग वाकुडेपणा हा,
कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी’
खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
'शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर'
कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
अभिव्यक्ती.
पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा.
प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.
