Advertisements
Advertisements
Question
कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Explain
Advertisements
Solution
- वचन: कर्जरोखे म्हणजे त्यावर नमूद केलेली ठरावीक रक्कम कर्जाऊ घेतल्याने ती धारकाला देण्याचे वचन आहे.
- दर्शनी मूल्य: कर्जरोख्यांचे दर्शनीमूल्य हे तुलनेने जास्त असते. उदा. रु. १०० किंवा रु. १०० च्या पटीत असते.
- रक्कम परतफेडीची वेळ: कर्जरोख्यांची मुद्दलाची रक्कम ठरावीक मुदतीनंतर परत केली जाते. कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जाऊ रक्कम परत करण्याची तारीख नमूद केलेली असते.
- व्याज: कर्जरोख्यांना निश्चित दराने व ठरावीक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीने नफा कमावला असेल किंवा नसेल तरीही व्याज देणे कंपनीस बंधनकारक आहे.
- परतफेडीचे आश्वासन: कर्जरोखे हे दीर्घमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. कर्ज ठरावीक मुदतीत परत करण्याची हमी यामध्ये दिलेली असते.
- कर्जरोख्यांसंबंधित घटक:
- कंपनी: कर्ज घेणारी संस्था होय.
- विश्वस्त: कंपनी जर ५०० पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकत असेल तर कंपनी कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करते. या विश्वस्तांमार्फत कंपनी कर्जरोखेधारकांशी व्यवहार करते. विश्वस्तांशी कंपनी करार करते. या करारास ‘विश्वस्त करार’ असे म्हणतात. यामध्ये कंपनीचे कर्तव्य, कर्जरोखेधारकांचे हक्क, विश्वस्तांचे अधिकार इ. नमूद केलेले असतात.
- कर्जरोखे धारक: या व्यक्ती कंपनीस कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देतात. त्यांना या कर्जाचा पुरावा म्हणून “कर्जरोखे प्रमाणपत्र' दिले जाते.
- कर्जरोखे धारकांचे अधिकार: कर्जरोखे धारकांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार नाही.
- सुरक्षा: कंपनीच्या काही मालमत्तेसह कर्जरोखे सुरक्षित केले जाऊ शकते.
- कर्जरोखे जारी करण्याच्या अटी:
- कर्जरोखे सममूल्य, प्रीमियम आणि अगदी सवलतीच्या दराने जारी केले जाऊ शकतात.
- कंपनी कायद्यानुसार, कंपनी मतदानाचा अधिकार असलेले कर्जरोखे जारी करू शकत नाही.
- कंपनी कायद्याच्या कलम २९२ (१) नुसार संचालक मंडळाला कर्जरोखे जारी करण्याचा अधिकार आहे.
- नोंदणी: कर्जरोख्यांची किमान एका मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
