English

कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

  1. संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे: संचालक मंडळाच्या सभेत कंपनीला खालील ठराव मंजूर करावे लागतात.
    1. विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचे प्रकार, रक्कम, विक्रीचे नियम व अटी.
    2. माहितीपत्रक किंवा मागणीपत्रास/लेटर ऑफ ऑफरला मान्यता.
    3. कर्जरोखे विश्वस्ताच्या नियुक्तीस मान्यता आणि त्यांची लेखी संमती मिळविणे.
    4. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे.
    5. संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता वाढवावयाची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलाविणे.
    6. अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे.
  2. विशेष सर्वसाधारण सभा भरविणे (EGM): संचालक मंडळाच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेत/अधिकारात वाढ करावयाची असेल तर भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा भरवावी लागते व या सभेत विशेष ठराव मंजूर करून त्यास मान्यता घ्यावी लागते.
  3. पतश्रेणी प्रमाणपत्र मिळविणे: कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडून आपल्या कर्जरोख्यांसाठी पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते. श्रेणीचा उल्लेख माहितीपत्रक किंवा मागणीपत्रात करावा लागतो.
  4. कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी: संचालक मंडळाच्या सभेनंतर ३० दिवसात चिटणिसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे विशेष ठराव, माहितीपत्रकाची प्रत, मागणीपत्र इ. ची नोंदणी करावी लागते.
  5. हमीदारांशी करार: कर्जरोख्यांच्या विक्रीच्या हमीबाबत कंपनीला कर्जरोखे विक्री हमीदारांबरोबर करार करावा लागतो.
  6. माहितीपत्रक किंवा मागणीपत्र प्रसिद्ध करणे/देणे: जनतेला कर्जरोखे खरेदी करण्याचे आवाहन करावयाचे असल्यास कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागते. खाजगीरित्या भांडवल उभारणी करताना मागणीपत्रे (offer letter) आणि हक्क विक्रीसाठी कंपनीला लेटर ऑफ ऑफर प्रसिद्ध करावे लागते/द्यावे लागते.
  7. स्वतंत्र बँकेत खाते उघडणे: अर्जदारांकडून अर्जशुल्क स्वीकारण्यासाठी कंपनीला शेड्यूल्ड बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागते.
  8. अर्ज शुल्क स्वीकारणे: माहितीपत्रक किंवा मागणीपत्रात उल्लेख केलेल्या कालावधीत अर्जदाराला अर्जशुल्कासह अर्ज कंपनीने नेमून दिलेल्या बँकेत सादर करावा लागतो.
  9. संचालक मंडळाची सभा भरविणे: कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्जरोखे वाटपाबाबत विचारविनिमय करण्यासाठी व त्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठीची मान्यताही या सभेत दिली जाते.
  10. कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप: अर्ज आणि अर्ज शुल्क मिळाल्यापासून ६० दिवसाच्या आत कंपनीला कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते. कंपनीला कर्जरोखे वाटपानंतर ६ महिन्याच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र द्यावे लागते.
  11. कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी करणे: संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर चिटणिसाला ७ दिवसात कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी कराव्या लागतात. जर कर्जराख्यांची विक्री डिमॅट पद्धतीने केली असेल तर त्याची नोंदवहीमध्ये नोंद करावी लागत नाही.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×