Advertisements
Advertisements
Question
अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Explain
Advertisements
Solution
- लाभांशासाठी अग्रहक्क: अग्रहक्क भागधारकांचा वार्षिक निव्वळ नफ्याच्या (net profit) वितरणीय रक्कमेवर प्रथम दावा असतो. समहक्क भागांना लाभांश देण्यापूर्वी अग्रहक्क भागांना लाभांश दिला जातो.
- भांडवल परतफेडीचा अग्रहक्क: कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी या भागांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. यामुळे भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागधारकांचे संरक्षण होते.
- निश्चित परतावा: अग्रहक्क भागांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. हा दर पूर्वनिर्धारित असतो. हा निश्चित रकमेच्या स्वरूपात असतो किंवा नित दराने दिला जातो. अग्रहक्क भागांना केवळ नफ्यामधूनच लाभांश दिला जातो. लाभांश दर निश्चित असला तरी कर्जावरील निश्चित व्याज दर व या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आर्थिक संकटाच्या काळात संचालकांनी कोणताही लाभांश न देण्याचा निर्णय घेतला तर अग्रहक्क भागधारकांना न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही.
- भांडवलाचे स्वरूप: अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवत नाहीत. एका ठरावीक कालावधीनंतर त्यांच्या भांडवलाची परतफेड केली जाते. कंपनी ‘न परतफेडीच्या’ अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. कंपनी स्थापनेनंतरच्या काळामध्ये हे अग्रहक्क भाग भांडवल गोळा केले जाते. हे भाग कंपनीच्या अतिरिक्त भांडवलाची गरज भागविण्यासाठी विक्रीस आणले जातात. लाभांशाचे दर तसेच बाजार मूल्य यात चढ उतार होत नसल्याने अग्रहक्क भाग भांडवल हे ‘सुरक्षित भांडवल’ समजले जाते.
- बाजारमूल्य: अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजारमूल्य बदलत नाही. समहक्क भागांशी याची तुलना केल्यास या भागांची मूल्य वृद्धी होत नाही.
- मतदानाचा अधिकार: अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात. कंपनीच्या कामकाजावर नियत्रंण ठेवण्याचा अधिकार यांना नाही. परंतु थेट त्यांच्या अधिकारावर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे. उदाहरणार्थ - भांडवलाच्या परतफेडीच्या अटींमधील बदल किंवा दोन वर्षांपासूनच्या लाभांशाची थकबाकी आहे. अशा मुद्द्यांसाठी ते मतदान करू शकतात.
- जोखीम: सावध असणारे गुंतवणूकदार साधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे दोन फायदे अग्रहक्क भागांशी निगडित आहेत. त्यामुळे मंदीच्या काळात जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते. अशावेळी या भागधारकांना अग्रहक्क एक वरदानच असते.
- दर्शनी मूल्य: समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य जास्त असते. त्यांचे दर्शनी मूल्य साधारण रु. १००/- इतके असते.
- हक्कभाग व बोनस भाग: अग्रहक्क भाग हे हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास पात्र नसतात.
- गुंतवणूकदाराचे स्वरूप: माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना हे भाग आकर्षित करतात. परिवर्तनास विरोध करणारा, सावध, भांडवलाच्या सुरक्षिततेत स्वारस्य असणारा, गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा करणारा गुंतवणूकदार अशा भागांना पसंती देतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
