Advertisements
Advertisements
प्रश्न
कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
- संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे: संचालक मंडळाच्या सभेत कंपनीला खालील ठराव मंजूर करावे लागतात.
- विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचे प्रकार, रक्कम, विक्रीचे नियम व अटी.
- माहितीपत्रक किंवा मागणीपत्रास/लेटर ऑफ ऑफरला मान्यता.
- कर्जरोखे विश्वस्ताच्या नियुक्तीस मान्यता आणि त्यांची लेखी संमती मिळविणे.
- कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे.
- संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता वाढवावयाची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलाविणे.
- अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे.
- विशेष सर्वसाधारण सभा भरविणे (EGM): संचालक मंडळाच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेत/अधिकारात वाढ करावयाची असेल तर भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा भरवावी लागते व या सभेत विशेष ठराव मंजूर करून त्यास मान्यता घ्यावी लागते.
- पतश्रेणी प्रमाणपत्र मिळविणे: कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडून आपल्या कर्जरोख्यांसाठी पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते. श्रेणीचा उल्लेख माहितीपत्रक किंवा मागणीपत्रात करावा लागतो.
- कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी: संचालक मंडळाच्या सभेनंतर ३० दिवसात चिटणिसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे विशेष ठराव, माहितीपत्रकाची प्रत, मागणीपत्र इ. ची नोंदणी करावी लागते.
- हमीदारांशी करार: कर्जरोख्यांच्या विक्रीच्या हमीबाबत कंपनीला कर्जरोखे विक्री हमीदारांबरोबर करार करावा लागतो.
- माहितीपत्रक किंवा मागणीपत्र प्रसिद्ध करणे/देणे: जनतेला कर्जरोखे खरेदी करण्याचे आवाहन करावयाचे असल्यास कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागते. खाजगीरित्या भांडवल उभारणी करताना मागणीपत्रे (offer letter) आणि हक्क विक्रीसाठी कंपनीला लेटर ऑफ ऑफर प्रसिद्ध करावे लागते/द्यावे लागते.
- स्वतंत्र बँकेत खाते उघडणे: अर्जदारांकडून अर्जशुल्क स्वीकारण्यासाठी कंपनीला शेड्यूल्ड बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागते.
- अर्ज शुल्क स्वीकारणे: माहितीपत्रक किंवा मागणीपत्रात उल्लेख केलेल्या कालावधीत अर्जदाराला अर्जशुल्कासह अर्ज कंपनीने नेमून दिलेल्या बँकेत सादर करावा लागतो.
- संचालक मंडळाची सभा भरविणे: कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्जरोखे वाटपाबाबत विचारविनिमय करण्यासाठी व त्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठीची मान्यताही या सभेत दिली जाते.
- कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप: अर्ज आणि अर्ज शुल्क मिळाल्यापासून ६० दिवसाच्या आत कंपनीला कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते. कंपनीला कर्जरोखे वाटपानंतर ६ महिन्याच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र द्यावे लागते.
- कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी करणे: संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर चिटणिसाला ७ दिवसात कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी कराव्या लागतात. जर कर्जराख्यांची विक्री डिमॅट पद्धतीने केली असेल तर त्याची नोंदवहीमध्ये नोंद करावी लागत नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
