Advertisements
Advertisements
Question
खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे कोणतेही चार घटक विशद करा.
Very Long Answer
Advertisements
Solution
- व्यवसायाचे आकारमान: व्यवसायाच्या आकारमानाचा अंदाज त्याच्या एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावरून ठरविला जातो. मोठ्या प्रमाणावर (large scale) व्यापार करणाऱ्या कंपनीस खेळत्या भांडवलाची अधिक गरज असते.
- विक्रीचे प्रमाण: हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एकूण विक्रीचे प्रमाण व खेळते भांडवल यांचे एकमेकांशी थेट नातेआहे. जर विक्रीचे प्रमाण वाढते असेल तर त्याच प्रमाणात खेळते भांडवलही उपलब्ध करून द्यावे लागते.
- उत्पादन चक्र: कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला ‘उत्पादन चक्र’ असे म्हणतात. जर उत्पादन चक्राला लागणार कालावधी मोठा असेल तर खेळते भांडवल जास्त प्रमाणात लागते. या उलट जर उत्पादन चक्राचा कालावधी कमी असेल तर खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते.
- व्यापारी चक्र: जेव्हा बाजारात ‘तेजी’ असते तेव्हा विक्रीच्या एकूण प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळे वस्तूंचा साठा (stock) वाढविणे आवश्यक असते. मालसाठा करून ठेवण्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज असते. यासाठी अतिरिक्त खेळत्या भांडवलाचा उपयोग करणे क्रम प्राप्त होते. या उलट जेव्हा मंदीचा काळ असतो तेव्हा विक्रिचे प्रमाण कमी असते त्यामुळे खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी झालेली असते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
