Advertisements
Advertisements
Questions
अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये विशद करा.
Explain
Very Long Answer
Advertisements
Solution
अर्थ:
संचालक मंडळाने दोन वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान जाहीर केलेल्या लाभांशास अंतरिम लाभांश म्हणतात. जर लेखा कालावधीसाठी कंपनीचा नफा पुरेसा न्याय ठरला तरच अंतरिम लाभांश देता येतो. त्यासाठी कंपनीच्या लेखा अंकेक्षकाचे मत घेतले पाहिजे. कंपनीच्या नियमावलीने दिलेल्या अधिकारानुसार संचालक मंडळ मध्यावधी लाभांश घोषित करते.
वैशिष्ट्ये:
- अंतरिम लाभांश जाहीर करण्याचे अधिकार संचालक मंडळाला असतात.
- अंतरिम लाभांश वर्षाच्या त्या कालावधीतील लाभांश फक्त देय असेल.
- अंतरिम लाभांश जाहीर करण्यापूर्वी कंपनीने वर्षातील काही महिन्यांच्या प्रमाणात नव्हे तर संपूर्ण वर्षांसाठी घसाऱ्याची तरतूद केली पाहिजे.
- कोणत्याही राखीव निधीतून अंतरिम लाभांश देता येत नाही.
- कंपनीच्या नियमावलीने अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा अधिकार संचालक मंडळाला दिलेला असला पाहिजे.
- संचालक मंडळाच्या सभेत अंतरिम लाभांश घोषित करण्याचा ठराव संमत करावा लागतो.
- अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यानंतर ५ दिवसांच्या आत घोषित केलेल्या लाभांशाची रक्कम शेड्युल्ड बँकेच्या स्वतंत्र खात्यात जमा करणे आवश्यक आहे.
- अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यापासून ३० दिवसांच्या आत वाटप करणे आवश्यक आहे.
- न दिलेला किंवा मागणी न केलेला अंतरिम लाभांश ‘लाभांश देणे खाते’ या खात्यात लाभांश वाटपाची मुदत संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत म्हणजे घोषणेपासून ३० दिवसांनंतर किंवा घोषणा झाल्यानंतर ३७ दिवसांच्या आत वर्ग करावी लागते.
- लाभांश देणे खात्यात वर्ग केलेली लाभांश रक्कम वर्ग केलेल्या तारखेपासून ७ वर्षाच्या आत न दिल्यास कंपनीस सदर रक्कम गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी खाते आयईपीएफ (Investor’s Education and Protection Fund - IEPF) मध्ये वर्ग करावी लागते.
shaalaa.com
अंतरिम लाभांश
Is there an error in this question or solution?
