English

खालील विधान सकारण स्पष्ट करा: अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. ज्या प्रकारच्या भागांच्या बाबतीत लाभांशासंबंधी व भांडवल परतफेडीसंबंधी कंपनी कायद्यानुसार भागधारकांना विशेष हक्क असतात, अशा प्रकारच्या भागांना ‘अग्रहक्क भाग’ म्हणतात. या भागांवर पूर्वनियोजित निश्‍चित दराने लाभांश दिला जातो.
  2. अग्रहक्क भागांना सामान्य भागांच्या तुलनेत कायद्याने विशेष हक्क प्राप्त झाले असल्यामुळे या भागधारकांना काहीच धोके पत्करावे लागत नाहीत; म्हणून त्यांना व्यवस्थापनात भाग घेण्याचा अधिकार नसतो.
  3. भागधारकांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या नियमावलीत नमूद केलेले असतात. समहक्क भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात. कंपनीच्या सर्वसाधारण सभांमध्ये समहक्क भागधारकांप्रमाणे अग्रहक्क भागधारकांना नेहमीचे सर्वसाधारण मताधिकार नसतात. त्यांना मर्यादित स्वरूपाचे मताधिकार असतात.
  4. अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या हितसंबंधांविषयी ठराव असेल किंवा त्यांना सतत दोन वर्षे लाभांश देण्यात आला नसेल, तर त्यांना मताधिकार असतात. त्यासाठी त्यांना सर्व अग्रहक्क भागधारकांची सभा (वर्गसभा ) बोलवावी लागते व ठराव मंजूर करून घ्यावे लागतात. सबब, अग्रहक्क भागधारकांना सर्वसामान्य परिस्थितीत मतदान करण्याचा अधिकार नसतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×