Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात.
कारण बताइए
Advertisements
उत्तर
- ज्या प्रकारच्या भागांच्या बाबतीत लाभांशासंबंधी व भांडवल परतफेडीसंबंधी कंपनी कायद्यानुसार भागधारकांना विशेष हक्क असतात, अशा प्रकारच्या भागांना ‘अग्रहक्क भाग’ म्हणतात. या भागांवर पूर्वनियोजित निश्चित दराने लाभांश दिला जातो.
- अग्रहक्क भागांना सामान्य भागांच्या तुलनेत कायद्याने विशेष हक्क प्राप्त झाले असल्यामुळे या भागधारकांना काहीच धोके पत्करावे लागत नाहीत; म्हणून त्यांना व्यवस्थापनात भाग घेण्याचा अधिकार नसतो.
- भागधारकांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या नियमावलीत नमूद केलेले असतात. समहक्क भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात. कंपनीच्या सर्वसाधारण सभांमध्ये समहक्क भागधारकांप्रमाणे अग्रहक्क भागधारकांना नेहमीचे सर्वसाधारण मताधिकार नसतात. त्यांना मर्यादित स्वरूपाचे मताधिकार असतात.
- अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या हितसंबंधांविषयी ठराव असेल किंवा त्यांना सतत दोन वर्षे लाभांश देण्यात आला नसेल, तर त्यांना मताधिकार असतात. त्यासाठी त्यांना सर्व अग्रहक्क भागधारकांची सभा (वर्गसभा ) बोलवावी लागते व ठराव मंजूर करून घ्यावे लागतात. सबब, अग्रहक्क भागधारकांना सर्वसामान्य परिस्थितीत मतदान करण्याचा अधिकार नसतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
