English

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: भयगंड - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

भयगंड

Explain
Advertisements

Solution

  1. भयगंड विकृती म्हणजेच फोबिया हा एक मानसिक विकार आहे. ‘फोबिया’ (Phobia) हा शब्द ग्रीक भाषेतील ‘फोबोस’ (Phobos) या शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ भीती असा होतो. एखाद्या वस्तू, परिस्थिती किंवा प्रसंगामुळे प्रत्यक्षात फारसा धोका नसतानाही किंवा अजिबात धोका नसतानाही मनात निर्माण होणारी तीव्र आणि अनावश्यक भीती म्हणजे भयगंड होय. उदाहरणार्थ, कुत्रा, झुरळ, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी किंवा उंच जागा यांसारख्या गोष्टींबद्दल काही लोकांना अतिशय भीती वाटते.
  2. जर एखाद्या वस्तू किंवा परिस्थितीबद्दलची ही भीती सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहिली, तर ती भयगंड म्हणून ओळखली जाते. भयगंडचे अनेक प्रकार आढळतात. उदाहरणार्थ, विशिष्ट वस्तूंशी संबंधित भीती (Specific phobia), सामाजिक परिस्थितीतील भीती (Social phobia), तसेच उघड्या किंवा गर्दीच्या जागांची भीती (Agoraphobia) इत्यादी.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×