Advertisements
Advertisements
Question
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
वित्त गुंतवणुकीचा निर्णय
Explain
Advertisements
Solution
व्यावसायिक संस्थेला जेव्हा भांडवल प्राप्त करण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतात तेव्हा वित्तिय व्यवस्थापक पुढील निर्णय घेण्यास सज्ज होतो. हे निर्णय म्हणजे निधीचा योग्य रितीने उपयोग करून भागधारकांना कमाल लाभांश मिळवून देणे. याकरिता संस्थेला ‘भांडवलाचे मूल्य’ विचारात घ्यावे लागते. एकदा भांडवलाचे मूल्य कळले की, मग भांडवलावरील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल, अशा पद्धतीने निधींचे नियोजन संस्था करू शकते. गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळविणे व व्यवसायामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणे यालाच ‘गुंतवणुकीचा निर्णय’ असे म्हणतात. या संकल्पनेला ‘भांडवली अर्थसंकल्प’ असेही संबोधले जाते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
