English

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: वाहतूक - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

वाहतूक

Explain
Advertisements

Solution

वाहतूक/दळणवळण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी माणसांची, प्राण्यांची किंवा मालमत्तेची ने-आण करणे अथवा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी मालमत्ता नेण्याचे - आणण्याचे साधन म्हणून दळण-वळण परिभाषित केले जाऊ शकते. सामान्यतः वाहतुकीचे काम रेल्वेमार्ग, रस्ता, जलमार्ग आणि हवाईमार्ग मार्फत केले जाते. वाहतुकीचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.

  1. रस्ते/भूपृष्ठ वाहतूक: रस्ते म्हणजे भूपृष्ठावर लोकांना अथवा ठिकाणांना एकमेकांशी जोडले जाणारे साधन होय. इतर वाहतुकीच्या तुलनेत रस्ते वाहतूक अधिक सक्षमपणे सेवा प्रदान करतात. 
  2. रेल्वे वाहतूक: रेल्वे मार्गावरील माल व प्रवाशांच्या वाहतुकीस रेल्वे वाहतूक असे म्हणतात. आपल्या देशामध्ये भू-वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे वाहतुकीचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि लांब पल्ल्याच्या वस्तू आणि प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे वाहतूक हा विश्वासार्ह प्रकार आहे.
  3. हवाई वाहतूक: हवाई वाहतुकीमध्ये विविध वाहतूक साधने जसे की प्रवासी विमान, मालवाहू विमान, हेलिकॉप्टर वापरून सामान व प्रवाशांची हवाई मागाद्‌वारे ने-आण केली जाते. 
  4. जलवाहतूक: जलवाहतूक म्हणजे बोट, जहाजे इत्यादींचा वापर करून जलनमार्गावर वस्तू/सामान आणि प्रवाशांची वेगवेगळ्या ठिकाणी देशांतर्गत आणि देशाबाहेरदेखील वाहतूक करणे होय.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×