Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
वाहतूक
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
वाहतूक/दळणवळण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी माणसांची, प्राण्यांची किंवा मालमत्तेची ने-आण करणे अथवा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी मालमत्ता नेण्याचे - आणण्याचे साधन म्हणून दळण-वळण परिभाषित केले जाऊ शकते. सामान्यतः वाहतुकीचे काम रेल्वेमार्ग, रस्ता, जलमार्ग आणि हवाईमार्ग मार्फत केले जाते. वाहतुकीचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.
- रस्ते/भूपृष्ठ वाहतूक: रस्ते म्हणजे भूपृष्ठावर लोकांना अथवा ठिकाणांना एकमेकांशी जोडले जाणारे साधन होय. इतर वाहतुकीच्या तुलनेत रस्ते वाहतूक अधिक सक्षमपणे सेवा प्रदान करतात.
- रेल्वे वाहतूक: रेल्वे मार्गावरील माल व प्रवाशांच्या वाहतुकीस रेल्वे वाहतूक असे म्हणतात. आपल्या देशामध्ये भू-वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे वाहतुकीचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि लांब पल्ल्याच्या वस्तू आणि प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे वाहतूक हा विश्वासार्ह प्रकार आहे.
- हवाई वाहतूक: हवाई वाहतुकीमध्ये विविध वाहतूक साधने जसे की प्रवासी विमान, मालवाहू विमान, हेलिकॉप्टर वापरून सामान व प्रवाशांची हवाई मागाद्वारे ने-आण केली जाते.
-
जलवाहतूक: जलवाहतूक म्हणजे बोट, जहाजे इत्यादींचा वापर करून जलनमार्गावर वस्तू/सामान आणि प्रवाशांची वेगवेगळ्या ठिकाणी देशांतर्गत आणि देशाबाहेरदेखील वाहतूक करणे होय.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
