Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
लोक अदालत
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याची एक प्रभावी आणि कमी खर्चीक पद्धत म्हणजे लोक अदालत होय. लोक अदालतीस लोकन्यायालय म्हणून पण ओळखले जाते. एखादा खटला तडजोडीने सोडविण्यासाठी शासनाकडून तिची स्थापना करण्यात आली आहे. तक्रारकर्ता लोक अदालतीमध्ये प्रत्यक्ष तक्रार दाखल करू शकतो. या ग्राहकांच्या तक्रारी व समस्यासंबंधी ताबडतोब निर्णय घेतले जातात. लोक अदालतीत झालेल्या निर्णयास कायदेशीर मान्यता मिळते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रेल्वे, विमा कंपनी, बँका या सारख्या संस्था नियमितपणे लोक अदालत भरवतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
