English

खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा. वर्गमध्य वारंवारता 5 3 15 9 25 15 35 13 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.

वर्गमध्य वारंवारता
5 3
15 9
25 15
35 13
Sum
Advertisements

Solution

समजा, 5 वर्गमध्य असलेल्या वर्गांची खालची मर्यादा x1 व वरची मर्यादा x2 असे मानू.

वर्गमध्य = `("खालची वर्गमर्यादा" + "वरची वर्गमर्यादा")/2`

`5 = (x_1 + x_2)/2`

∴ x1 + x2 = 10    ... (1)

लगतच्या दोन वर्गांच्या वर्गमध्यांमधील फरक हा प्रत्येक वर्गाच्या वर्गांतराएवढा असतो.

∴ वर्गांतर = 15 − 5 = 25 − 15 = 10

∴ x2 + x1 = 10

∴ − x1 + x2 = 10   ...(2)

समी (1) व (2) बेरीज करू.

    x1 + x2 = 10

+ − x1 + x2 = 10
_____________
           2x2 = 20

∴ x2 = 10

x2 = 10 हि किंमत समी 1 मध्ये ठेवू.

x1 + 10 = 10

∴ x1 = 10 − 10

x1 = 0

∴ पहिला वर्ग = 0 − 10. यावरून पुढचे वर्ग 10 − 20, 20 − 30 व 30 − 40 आहेत.

अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी

वर्ग वर्गमध्य  वारंवारता
0 − 10 5 3
10 − 20 15 9
20 − 30  25 15
30 − 40 35 13

वर्गांतर = वर्गाची वरची मर्यादा − वर्गाची खालची मर्यादा

= 10 − 0 = 10

खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी

वर्ग वर्गमध्य  वारंवारता
0.5 − 9.5 5 3
10.5 − 19.5 15 9
20.5 − 29.5 25 15
30.5 − 39.5 35 13
shaalaa.com
वारंवारता वितरण सारणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: सांख्यिकी - सरावसंच 7.3 [Page 119]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 7 सांख्यिकी
सरावसंच 7.3 | Q (7) (i) | Page 119

RELATED QUESTIONS

20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा.


35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा.


एका वर्गाचा मध्य 10 असून वर्गअवकाश 6 आहे, तर ताे वर्ग कोणता?


एका शाळेच्या हरितसेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे.

3, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 7, 5 , 3, 6, 6, 5, 3, 4, 5, 7, 3, 5, 6, 4, 4, 3, 5, 6, 6, 4, 3, 5, 7, 3, 4, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 4, 7.

यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


π ची 50 दशांश स्थळांपर्यंत किंमत खाली दिलेली आहे. 3.14159265358979323846264338327950288419716939937510

यावरून दशांश चिन्हानंतरच्या अंकांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.

वर्गमध्य वारंवारता
22 6
24 7
26 13
28 4

एका संस्थेला ‘दिव्यांग विकास निधी’ साठी गावातील 38 लोकांनी प्रत्येकी काही रुपये दिले, ही माहिती खाली दिली आहे.

101, 500, 401, 201, 301, 160, 210, 125, 175, 190, 450, 151, 101, 351, 251, 451, 151, 260, 360, 410, 150, 125, 161, 195, 351, 170, 225, 260, 290, 310, 360, 425, 420, 100, 105, 170, 250, 100

  1. 100 − 149, 150 − 199, 200 − 249, ... असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
  2. सारणीवरून 350 रुपये व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती आहे हे लिहा.

25 − 35 ह्या वर्गाचा वर्गमध्य कोणता?


0 − 10, 10 − 20, 20 − 30.... असे वर्ग असणाऱ्या वारंवारता सारणीत 10 हा प्रप्तांक कोणत्या वर्गात समाविष्ट करावा?


एका शहराचे एका महिन्याचे दररोजचे कमाल तापमान सेल्सिअस अंशांमध्ये खालीलप्रमाणे आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी (सलग वर्ग) तयार करा.

29.2, 29.0, 28.1, 28.5, 32.9, 29.2, 34.2, 36.8, 32.0, 31.0, 30.5, 30.0, 33, 32.5, 35.5, 34.0, 32.9, 31.5, 30.3, 31.4, 30.3, 34.7, 35.0, 32.5, 33.5, 29.0, 29.5, 29.9, 33.2, 30.2

सारणीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. कमाल तापमान 34°c पेक्षा कमी असणारे दिवस किती?
  2. कमाल तापमान 34°c किंवा त्यापेक्षा जास्त असणारे दिवस किती?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×