जीवनात निर्माण झालेल्या अडचणींवर उपाय शोधण्याच्या प्रक्रियेला ‘समस्या परिहार’ म्हणतात.
- समस्या ओळखणे: या अवस्थेत आपण समस्याओळखणे आणि ती व्यवस्थित मांडणे आवश्यक असते. समस्या ओळखता आली नाही तर समस्या सुटणे शकयहोत नाही. उदा., जर एखादे बाळ पोटदुखीमुळे रडत असेल, परंतु त्याच्या आईने बाळ भूक लागल्यामुळे रडत असेल असा अंदाज केला, तर समस्या ओळखण्यात चूक झाल्यामुळे समस्या सुटणार नाही.
- पर्याय उपाय शोधणे: प्रत्येक समस्येसाठी निरनिराळे उपाय असतात, काही प्रभावी ठरतात तर काही निष्फळ ठरतात. समस्येचे निराकरण करण्याच्या या पायरीवरआपण त्या समस्येचे निराकरण करू शकणाऱ्या सर्व संभाव्य उपायांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. उदा., एखाद्या व्यक्तीला डोकेदुखीचा खूप त्रास होत असेल, तर तो आराम करणे, संगीत ऐकणे, ध्यान धरणे, औषधेघेणे इत्यादी पर्यायी उपायांचा विचार करू लागतो.
- योग्य पर्याय निवडणे: ही समस्या परीहाराची तिसरी पायरी होय. यात आपण अनेक पर्यायांतून एका तर्कनिष्ठ पर्यायाची निवड करतो. व्यक्तीची तर्कसंगत क्षमता त्याला समस्या अधिक वास्तविकतेने सोडविण्यास मदत करते. उदा., याआधी झालेला डोकेदुखीचा त्रास ध्यान धरल्यामुळे कमी झाला हे जर व्यक्तीला आठवले, तर यावेळीही ती व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी त्याच पर्यायाची निवड करेल.
- पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे: समस्या परीहार करण्यातील ही शेवटची पायरी आहे. यात आपण प्रत्यक्षात एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी करतो आणि त्याद्वारे समस्येचे निराकरण करण्यात मदत झाली की नाही याचे मूल्यमापन करतो. समस्येचे अद्याप निराकरण न झाल्यास, आपल्याला पुन्हा मागील पायऱ्यांवर जावे लागते आणि समस्या सोडवण्याची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते.
