English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा: मुद्दे योगी सर्वकाळ सुखदाता (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - (2) प्रस्तुत कवितेचा विषय - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:

मुद्दे योगी सर्वकाळ सुखदाता
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - जन निववी श्रवणकीर्तनें ।
निजज्ञानें उद्‌धरी ।।
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -  
(5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - (i) उदक -
(ii) मधुर - 
(iii) तृषित -
(iv) क्षाळणे -
Chart
Advertisements

Solution

मुद्दे योगी सर्वकाळ सुखदाता
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - कवी - संत एकनाथ
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - योगी पुरुष जगाच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सामान्य लोकांचा उद्धार होतो. कवीने योगी पुरुषांची तुलना पाण्याशी केली असून, त्यांच्यातील महानता अधोरेखित करताना योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात, असे स्पष्ट केले आहे.
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - संत एकनाथ महाराज योगी पुरुषांच्या महतीचे वर्णन करताना सांगतात की, सामान्य लोकांच्या उद्धारासाठी योगी पृथ्वीवर जन्म घेतात. जसे कृष्णमेघातून पाऊस पडल्यावर जमीन धनधान्याने भरभरून जाते आणि लोकांना अन्नधान्य व पाणी मिळाल्याने ते सुखी व समाधानी होतात, तसेच स्वर्गलोकातून योगी पृथ्वीवर येतात. ते तपश्चर्येतून प्राप्त केलेले आत्मज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात. हरिकीर्तन आणि उपदेशाच्या माध्यमातून ते लोकांना योग्य मार्ग दाखवतात. या ज्ञानामुळे लोक समाधानी होतात, आणि योगी आत्मज्ञानाच्या जोरावर संपूर्ण समाजाचा उद्धार करतात.
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष आणि पाण्याची तुलना करून योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व प्रभावीपणे मांडले आहे. कवीने सोप्या भाषेत योगी सर्वकाळ सुखदायक कसा असतो, हे उदाहरणांद्वारे स्पष्ट केले आहे. योगी पुरुष आत्मज्ञानाद्वारे सामान्य लोकांचा उद्धार करतात, हा विचार कवितेत ठळकपणे मांडलेला आहे. समर्पक दृष्टान्त, प्रसादगुण, माधुर्य आणि शांत रसाने भरलेली ही रचना मनाला भावते. यामुळे ही कविता मला अत्यंत प्रिय वाटते.
(5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - (i) उदक - पाणी
(ii) मधुर - गोड
(iii) तृषित - तहानलेला
(iv) क्षाळणे - धुणे
shaalaa.com
योगी सर्वकाळ सुखदाता
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

(१) चौकटी पूर्ण करा.
(i) सर्वकाळ सुखदाता -
(ii) तात्पुरती तहान भागविणारे -
(iii) अभंगात वर्णन केलेला, चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी -
(iv) पिलांना सुरक्षितता देणारे -

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलीयांसी ।
जीवन जैसे कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ।।
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।।
उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती ।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाही ।।
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ।।
मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण ।
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।।
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।।

(2) तुलना करा.

योगीपुरुष पाणी
   

(३) योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

(४) ‘सर्वकाळ सुखदाता’ असे योगी पुरुषास म्हणण्याची कोणती कारणे असावीत, असे तुम्हांस वाटते?


खालील वाक्य पूर्ण करा.

अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______.  


खालील वाक्य पूर्ण करा.

पिलांना सुरक्षितता देणार - _______.


खालील वाक्य पूर्ण करा.

स्वत:ला मिळणारा आनंद - _______.


खालील वाक्य पूर्ण करा.

व्यक्तीला सदैव सुख देणारा - _______.


खालील तक्ता पूर्ण करा.

योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.

योगीपुरुष जीवन (पाणी)
   

खालील ओळींचे रसग्रहण करा.

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्‌धरी॥


‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.      8

1. चौकटी पूर्ण करा.     2

अ) चंद्रकिरण पिऊन जगणारा - ______ 

ब) पिल्लांना सहारा - ______ 

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।

जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।

जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।

उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।

उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।

योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।

उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।

योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।।

मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।

अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।

जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।

2. आकृती पूर्ण करा.      2

3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा.   2

  1. उदक - 
  2. मळ -
  3. रसना -
  4. निजज्ञान -

4. काव्यसाैंदर्य

योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.   2


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______
  2. चिरकाल टिकणारा आनंद - ______

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।

जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।

जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।

उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।

उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।

योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।

उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।

योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।।

मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।

अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।

जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्‌धरी।।

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. उदक -
  2. स्वानंदतृप्ती - 
  3. मृदुत्व - 
  4. इहलोकीं - 

४. काव्यसौंदर्य: (2)

योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, या वाक्याचे अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×