English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) योग्य पर्याय निवडा. (2) (1) सैनिकाचे औक्षण केले जाते ______. (i) भरलेल्या अंतःकरणाने (ii) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी (iii) तबकातील निरांजनाने

Advertisements
Advertisements

Question

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) योग्य पर्याय निवडा.             (2)

(1) सैनिकाचे औक्षण केले जाते ______.
(i) भरलेल्या अंतःकरणाने
(ii) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
(iii) तबकातील निरांजनाने
(iv) भाकरीच्या तुकड्याने

(2) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे ______.
(i) कष्टाचे, पैशाचे सामर्थ्य नसलेले
(ii) सैनिकाबरोबर लढणारे
(iii) शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले
(iv) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय

नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावें कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य;

जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान;
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;

वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,
धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचें;

तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी;
डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी

अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण

(2) कृती करा:        (2)

  1. डोळे भरून पाहावे असे दृश्य -
  2. अपुरे वाटणारे सामर्थ्य -

(3) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा:            (2)

  1. औक्षण -
  2. द्रव्य -
  3. शौर्य -
  4. आसवे -

(4) काव्यसौंदर्य:            (2)

‘अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण’

या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

Comprehension
Advertisements

Solution

(1)

(1) सैनिकाचे औक्षण केले जाते डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी.

(2) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.

(2)

  1. डोळे भरून पाहावे असे दृश्य - सैनिकाच्या विजयाची दौड
  2. अपुरे वाटणारे सामर्थ्य - कष्टाचे सामर्थ्य

(3)

  1. औक्षण - ओवाळणे
  2. द्रव्य - धन, पैसा
  3. शौर्य - साहस
  4. आसवे - अश्रू

(4) 'औक्षण' म्हणजे ओवाळणे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे एक प्रातिनिधिक औक्षण आहे. प्रस्तुत ओळीमध्ये डोळ्यांना निरंजनाची, तर अश्रुना निरंजनातील ज्योतीची उपमा देऊन सैनिकाच्या रक्षणासाठी देशवासियांच्या असंख्य ज्योती त्याचे जणू औक्षण करत आहेत. यांमध्ये पराक्रमी सैनिकाला सर्वार्थाने अक्षम, असमर्थ अशी भावना व्यक्त  केली आहे. गरीब, दीन दुबळे असुनही सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या लोकांचे वर्णन यामध्ये केले आहे.

shaalaa.com
औक्षण
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

RELATED QUESTIONS

‘‘औक्षण’ या कवितेसंबंधी खालील मुद्द्याांना अनुसरून कृती सोडवा.

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (०१ गुण)
  2. कवितेचा रचनाप्रकार - (०१ गुण)
  3. कवितेचा विषय - (०१ गुण)
  4. कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायी भाव) - (०१ गुण)
  5. कवितेतून व्यक्त होणारा विचार - (०२ गुण)
  6. कवितेतील आवडलेली ओळ - (०२ गुण)

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?


खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते?


योग्य पर्याय निवडा.

सैनिकाचे औक्षण केले जाते _________


योग्य पर्याय निवडा.

कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे _______


खालील ओळींचे रसग्रहण करा.

'अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.’


‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हांला काय करावेसे वाटते ते लिहा.


कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘औक्षण’
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(२) कवितेचा रचनाप्रकार -  
(३) कवितेचा काव्यसंग्रह -  
(४) कवितेचा विषय -  
(५) कवितेतील आवडलेली ओळ -  
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे -  

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘औक्षण’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘तुझ्या शौर्यगाथे पुढे।
त्याची केवढीशी शान॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) औक्षण -
(ii) आसव -
(iii) तोफ -
(iv) दीन -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) चौकटी पूर्ण करा. (2)

  1. डोळे भरून पहावी अशी - ______
  2. मुठीमध्ये नसलेले - ______

नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य;

जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान;

तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;

वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,

धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचें;

तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी;

डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी

अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;

दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.

(2) एका वाक्यात उत्तरे लिहा. (2)

  1. कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
  2. सैनिकांचे पाऊल जिद्दीचे का वाटते?

(3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. द्रव्य -
  2. आसवे -
  3. औक्षण -
  4. कल्लोळ -

(4) ‘सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा. (2)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×