- तणावाशी समायोजन: भावनिक सुदृढ व्यक्ती ताणाच्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे हाताळतात. ते आरोग्यदायी जीवनशैली अवलंबतात. जसे मित्रांशी चर्चा, व्यायाम इत्यादी.
- उच्च स्व-नियमन: या व्यक्ती चिंता, राग, भीती या भावनांना आपल्यावर वरचढ होऊ देत नाही. आपल्या भावनांना व्यवस्थित हाताळतात. आपल्या भावनिक स्थितीची त्यांना जाणीव असते. या नकारात्मक भावना जीवनाचा एक भाग आहे असे ते मानतात.
- कार्यक्षमता विकास: सकारात्मक भावना त्यांच्यात ऊर्जा व उत्साह निर्माण करतात. याचा फायदा त्यांना अभ्यासासाठी व विविध कामांमध्ये कार्यक्षमता उंचावण्यासाठी होतो. त्यांच्यामध्ये ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची व स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता असते.
- नवनिर्मितीक्षमता (सर्जनशीलता) विकास: जीवनाविषयी जिज्ञासा व नवनवीन ज्ञान, अनुभव प्राप्त करण्याची लालसा असते. समस्या सोडविण्याचा एक मार्ग अपयशी ठरला तरी इतर मार्ग शोधतात.
- जीवनाविषयी समाधानी वृत्ती: भावनिक सुदृढ व्यक्ती इतरांसोबत घनिष्ठ संबंध निर्माण करू शकतात. समाजासाठी स्वयंसेवेसारख्या कार्यातून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवतात.
Advertisements
Advertisements
Question
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
भावनिक सुदृढतेचे फायदे
Short/Brief Note
Advertisements
Solution
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
