Advertisements
Advertisements
Question
काव्यसौंदर्य.
‘नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Advertisements
Solution
कवयित्री कल्पना दुधाळ यांनी 'रोज मातीत' या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन यथायोग्य शब्दांत चित्रित केले आहे.
शेतकरी स्त्री दिवसरात्र शेतामधील अनेक कष्टांची कामे करते. ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते, तशी ती उसाची लागवडही करते. उसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये उसाची छोटी कांडे पेरावी लागतात. हे उसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते. बेणे नव्हे तर ती स्वत:चे मन त्यात दाबते. स्वत:ला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते. अशा प्रकारे काडी-काडी जोडून ती तिचा संसार सावरते. शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे.
शेतकरी स्त्री जी अहोरात्र शेतात जीव ओतून काम करते, त्याचे वर्णन करताना 'मन दाबणे' हा वाक्यप्रयोग करून शेतकरी स्त्रीचे मनोगत समर्थपणे कवयित्रीने या ओळीत व्यक्त केले आहे. काडी-काडी जोडून संसार सांधणे यातून तिच्या अविरत कष्टाचे यथोचित चित्र साधले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृती करा.

संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) नाही कांदा गं, जीव लावते. | (अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. |
| (२) काळ्या आईला, हिरवे गोंदते. | (आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. |
| (३) हिरवी होऊन, मागं उरते . | (इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. |
खालील ओळींचा अर्थलिहा.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काव्यसौंदर्य.
‘काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
अभिव्यक्ती.
शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
अभिव्यक्ती.
तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
खालील ओळींचा अर्थ लिहा:
|
सरी-वाफ्यात, कांदं लावते काळ्या आईला, हिरवं गोंदते |
‘सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते’
या कवितेतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - (२)
(य) ______
(र) ______
(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा - (२)
(य) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (१)
(र) स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (१)
|
सरी-वाफ्यात, कांदं लावते फुलं सोन्याची, झेंडू तोडते ऊस लावते, बेणं दाबते उन्हातान्हात, रोज मरते |
(३) अभिव्यक्ती - (४)
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
