English

जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, ACLN=47 तर ΔABC व ΔLBN काढा.

Advertisements
Advertisements

Question

जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.

Sum
Advertisements

Solution

 

कच्ची आकृती

विश्लेषण:

आकृतीत दाखवल्याप्रमाणे, समजा, B - C - N व B - A - L.

ΔABC ~ ΔLBN .....[पक्ष]

∴ ∠ABC ≅ ∠LBN  ....[समरूप त्रिकोणांचे संगत कोन]

`"AB"/"LB" = "BC"/"BN" = "AC"/"LN"` ....(i) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

परंतु, `"AC"/"LN" = 4/7` .....(ii) [पक्ष]

∴ `"AB"/"LB" = "BC"/"BN" = "AC"/"LN" = 4/7` ......[(i) व (ii) वरून]

∴ ΔLBN च्या बाजू ΔABC च्या संगत बाजूंपेक्षा मोठ्या आहेत.

∴ जर रेख BC चे 4 समान भाग केले, तर रेख BN ही त्यातील एका भागाच्या 7 पट एवढ्या लांबीची असेल, म्हणूनच जर ΔABC काढला, तर बिंदू N हा बाजू BC वर B पासून सात भाग अंतरावर असेल. आता, बिंदू N मधून AC ला समांतर काढलेली रेषा व किरण BA यांचा छेदनबिंदू L हा आहे. ΔLBN हा ΔABC शी समरूप असलेला इष्ट त्रिकोण आहे.

रचनेच्या पायऱ्या:

i. दिलेल्या मापाचा ΔABC काढा. बाजू BC शी लघुकोन करणारा किरण BD काढा.

ii. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन B1, B2, B3, B4, B5, B6 आणि B7 हे 7 बिंदू असे घ्या, की BB1 = B1B2 = B2B3 = B3B4 = B4B5 = B5B6 =  B6B7  

iii. B4C जोडा. बिंदू B7 मधून B4C ला समांतर रेषा काढा. B7 मधून जाणारी ही रेषा किरण BC ला बिंदू N मध्ये छेदते.

iv. बिंदू N मधून बाजू AC ला समांतर रेषा काढा. ही रेषा व किरण BA यांच्या छेदनबिंदूला L नाव द्या.

ΔLBN हा ΔABC चा इष्ट समरूप त्रिकोण आहे.   

shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [Page 99]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 भौमितिक रचना
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q 7. | Page 99

RELATED QUESTIONS

ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.


जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______ 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे. 


रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा. 


5 सेमी बाजू असलेला समभुज ΔABC काढा. ΔABC ∼ ΔLMN. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 6:7 असल्यास ΔLMN काढा.


ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा. 


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.


ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.


ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.


एक समद्विभुज त्रिकोण असा काढा, की त्याचा पाया 5 सेमी व उंची 4 सेमी आहे. त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण असा काढा, की त्याच्या बाजू मूळ त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या `2/3` पट आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×