Advertisements
Advertisements
Question
गोदामांचे विविध प्रकार स्पष्ट करा.
Explain
Advertisements
Solution
- खाजगी गोदामे: खाजगी गोदाम ही उत्पादक किंवा मोठे व्यापारी यांनी त्यांच्या साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधलेली असतात आणि त्यांच्यामार्फत चालविली जातात. मोठया व्यावसायिक आस्थापनांना, ज्यांना मोठया प्रमाणावर माल साठविण्याची आवश्यकता असते आणि अशी गोदामे ज्यांना बांधणे परवडते अशा व्यावसायिकांकडून बांधली व देखभाल केली जातात. मोठे उत्पादक अथवा घाऊक विक्रेत्यांकडे देशाच्या विविध भागात अशी गोदामे असू शकतात.
- सार्वजनिक गोदामे: सार्वजनिक गोदामे अशी विशिष्ट व्यवसाय संस्थापना आहे जी सर्वसामान्यांना ठरावीक रक्कम आकारून माल साठविण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. एखाद्या व्यक्तीमार्फत अथवा सहकारी संस्थे मार्फत यांचे संचालन केले जाते. सार्वजनिक गोदामे शासनाच्या परवान्याअंतर्गत विहित नियम व कायद्यांनुसार कार्य करतात. सार्वजनिक गोदामे लहान उत्पादकांना व व्यापाऱ्यांना कमी किंमतीत साठवणूकीची सुविधा उपलब्ध करून देतात. सार्वजनिक गोदामे ही योग्य प्रकारे बांधली जाऊन सदर गोदामांमध्ये मालाचे चोवीस तास संरक्षण केले जाते. सार्वजनिक गोदामे ही सामान्यतः लोहमार्ग, महामार्ग आणि जलमार्गाजवळ वसलेली असतात.
- करदेय गोदामे (Bonded warehouses): करदेय गोदामे ही सरकारकडून परवानाकृत असून आयात मालाचा साठा सीमाशुल्क भरेपर्यंत आयातदाराकडून उपयोगात आणली जातात. ही गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करतात. सदर गोदामांमध्ये, गोदाम चालकाला एक करार (Bond) करून दयावा लागतो ज्यामध्ये गोदाम चालक आयातदार सीमाशुल्क भरल्याशिवाय सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय मालाचा ताबा न देण्याबाबत कटिबद्ध असल्याचा निर्वाळा देतो. आयात माल कराराअंतर्गत (Bond) ठेवला जातो आणि संमतीशिवाय काढता येत नाहीत.
- करदत्त गोदामे (Duty paid): जर एखादया आयातदाराला वस्तूंच्या वाहतुकीत अडचणी येत असतील तर सीमाशुल्क भरल्यानंतर माल करदत्त गोदामांमध्ये ठेवला जाऊ शकतो. सर्व करदत्त गोदामे ही सार्वजनिक गोदामे आहेत जी आयातदारांना उपलब्ध आहेत. सर्व गोदामे आयातदारांना उपयुक्त आहेत कारण की मालाची योग्य ती काळजी घेतली जाते व विविध प्रक्रिया (जसे की विभागणी, पुनर्वेष्टन इ. प्रक्रिया केल्या जातात.) वस्तूंच्या पुनर्निर्यातीसाठी सदर गोदामे अधिक उपयोगी असतात. सदर गोदामे बंदर अथवा गोदी क्षेत्राजवळ प्रकर्षाने आढळतात.
- शासकीय गोदामे (Government): ही गोदामे केंद्र व राज्य सरकार किंवा सार्वजनिक सरकारी संस्थांच्या मालकीची असून त्यांच्याद्वारे व्यवस्थापित असतात. छोटे शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते यांना गोदामे बांधणे जिकिरीचे असते. अशावेळी शासकीय गोदामे त्यांना अत्यंत माफक किंमतीमध्ये या गोदामांमध्ये माल ठेवण्याची मुभा देतात. वेगवेगळ्या राज्यात आणि देशभरात केंद्रीय भंडारण निगम (Central warehousing Corporation), राज्य वखार महामंडळ (State Warehousing Corporation), भारतीय खाद्य निगम (Food Corporation of India) इत्यादींची गोदामे आहेत.
- सहकारी गोदामे: ही गोदामे सहकारी संस्थांच्या मालकीची, व्यवस्थापित व नियंत्रित आहेत. ती मुख्यत: अत्यंत किफायतशीर दराने गोदाम सुविधा उपलब्ध करून देतात. अशा प्रकारची गोदामे शेतकरी आणि व्यापारी तसेच सामान्य जनतेसाठी उपयुक्त आहेत.
- शीतगृहे: फळे, फुले, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ अशा नाशवंत वस्तू साठविण्यासाठी शीतगृहांचा उपयोग होतो. शीतगृहांमध्ये वस्तू अतिशय कमी तापमानात गोठविल्या जातात. जेणेकरून त्या साठविणे व भविष्यात त्याचा वापर करणे शक्य होते. अशा शीतगृहांमुळेच जागतिक व्यापार शक्य झाला आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Question Paper
