English

फरक स्पष्ट करा: राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा:

राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग

Distinguish Between
Advertisements

Solution

मुद्दे राज्य आयोग राष्ट्रीय आयोग
सदस्य यामध्ये एक अध्यक्ष आणि दोन किंवा अधिक सदस्यांचा समावेश असतो, ज्यांपैकी एक महिला असणे आवश्यक आहे. यामध्ये एक अध्यक्ष आणि चार किंवा अधिक सदस्यांचा समावेश असतो, ज्यांपैकी एक महिला असणे आवश्यक आहे.
नुकसान भरपाईचा दावा हा २० लाख रुपयांपेक्षा जास्त परंतु १ कोटी रुपयांपेक्षा कमी असतो. हा १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असतो.
अपील करण्याची संधी राज्य आयोगाने दिलेल्या आदेशाने जर एखादयाचे समाधान झाले नसेल, तर राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्ध ३० दिवसांच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागू शकतो. राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या आदेशाने जर एखाद्याचे समाधान झाले नसेल, तर राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाविरुद्ध ३० दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
अध्यक्ष उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश.
आर्थिक अधिकार क्षेत्र वस्तू किंवा सेवांचे एकूण मूल्य (नुकसानभरपाईसह) १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पण १० कोटी रुपयांपेक्षा कमी असल्यास तक्रारींचा विचार करण्याचे अधिकार आहेत. १० कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या वस्तू आणि सेवांशी संबंधित (नुकसानभरपाईसह) तक्रारींचा विचार करण्याचे आर्थिक अधिकार आहेत.
कालावधी प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची साठ वर्षे (यापैकी जे आधी असेल ते) इतका असतो. प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची सत्तर वर्षे (यापैकी जे आधी असेल ते) इतका असतो.
तक्रारींचे स्वरूप हा आयोग मूळ तक्रारी तसेच राज्याच्या भौगोलिक मर्यादेतील जिल्हा मंचाच्या आदेशाविरुद्धच्या अपीलांवर सुनावणी घेऊ शकतो. हा आयोग मूळ तक्रारी तसेच राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्धच्या अपीलांवर सुनावणी घेऊ शकतो.
व्याप्ती याची व्याप्ती एका विशिष्ट राज्यापुरती मर्यादित असते. याची व्याप्ती संपूर्ण देशात असते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×