English

फरक स्पष्ट करा: मध्यवर्ती बँक आणि व्यापारी (व्यावसायिक) बँक - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा:

मध्यवर्ती बँक आणि व्यापारी (व्यावसायिक) बँक

Distinguish Between
Advertisements

Solution

अ. क्र. मुद्दे मध्यवर्ती बँक व्यापारी (व्यावसायिक) बँक
१. स्थान किंवा दर्जा ही देशाच्या बँकिंग व्यवस्थेतील सर्वोच्च संस्था आहे. ही देशातील अनेक बँकांपैकी एक बँक आहे.
२. मालकी याची मालकी सरकारकडे असते. याची मालकी सामान्यतः भागधारकांकडे असते.
३. उद्दिष्ट देशाच्या हितासाठी सेवा देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट असते. नफा मिळवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट असते.
४. संख्या देशात केवळ एकच मध्यवर्ती बँक असते. देशात अनेक व्यापारी बँका असू शकतात.
५. मुख्य ग्राहक ही सरकारची बँक म्हणून कार्य करते. ही सर्वसामान्य जनतेची बँक म्हणून कार्य करते
६. नोटांची छपाई नोटा (चलन) छापण्याचा अधिकार या बँकेला एकाधिकार म्हणून प्राप्त असतो. या बँकांना नोटा छापता येत नाहीत.
७. इतर बँकांशी संबंध ही इतर सर्व बँकांवर नियंत्रण ठेवते. या बँका मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणाखाली काम करतात.
८. मुख्य कार्यकारी पद याच्या प्रमुखाला “गव्हर्नर” म्हणतात. याच्या मुख्य कार्यकारी प्रमुखाला “चेअरमन” म्हणतात.
९. कर्ज मध्यवर्ती बँक केवळ इतर बँकांना आणि वित्तीय संस्थांना कर्ज पुरवते. व्यापारी बँका व्यापारी, उद्योग आणि सर्वसामान्य लोकांना कर्ज देतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×