English

फरक स्पष्ट करा. भारत वनस्पती व ब्रझील वनस्पती - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

भारत वनस्पती व ब्रझील वनस्पती

Distinguish Between
Advertisements

Solution

  भारत ब्रझील
1. प्रामुख्याने आढळणारा वन प्रकार भारतात १००० मिमी ते २००० मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी वने सर्वाधिक प्रमाणात आढळतात. ब्रझीलच्या विषुववृत्तीय प्रदेशांत बहुतांश भागात वर्षभर पाऊस (सरासरी २००० मिमी) पडतो. त्यामुळे, ब्रझीलमध्ये प्रामुख्याने विषुववृत्तीय वने सर्वाधिक प्रमाणात आढळतात.
2. सूचीपर्णी वृक्षांची वने भारतीय हिमालयात, मध्यम उंचीच्या प्रदेशात सूचीपर्णी वृक्षांची वने आढळतात. उदा. पाइन, देवधर, फर आणि पायथ्यालगत मिश्र वने आढळतात. ब्रझीलमध्ये सूचीपर्णी वने आढळत नाहीत.
3. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने भारतात पश्चिम व ईशान्य भागात ज्या ठिकाणी २००० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो, तेथे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात. ब्राझीलमध्ये उत्तरेकडील प्रदेशात (ॲमेझॉन नदी खोरे) सदाहरित वने आढळतात.
4. काटेरी झुडपी वने राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांत ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, तिथे काटेरी झुडपी वने आढळतात. ब्रझीलच्या ईशान्येकडील भागात काटेरी झुडपी वने (कटिंगा) आहेत.
5. समुद्रकाठाची वने भारतात पूर्व किनाऱ्यावर काही भागांत समुद्रकाठाची वने आढळतात. ब्राझीलमध्ये भारताप्रमाणे समुद्रकाठाची वने आढळत नाहीत.
shaalaa.com
ब्राझील- वनस्पती
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: नैसर्गिक वनस्पती व प्राणी - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
फरक स्पष्ट करा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×