English

एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मी लंबउंचीपर्यंत पोहचतो. पतंगांच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्या मध्ये 60° मापाचा कोन तयार होतो. दोरा कोठेही वाकलेला नाही असे गृहीत - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मी लंबउंचीपर्यंत पोहचतो. पतंगांच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्या मध्ये 60° मापाचा कोन तयार होतो. दोरा कोठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. (`sqrt3` =1.73)

Sum
Advertisements

Solution

समजा, AB ही पतंगाची जमिनीपासूनची उंची आहे व बिंदू C पतंग जमिनीला जिथे बांधला आहे ते स्थान दर्शवते.

∠ACB हा दोऱ्याने जमिनीशी केलेला कोन आहे.

∠ACB = 60°

AB = 60 मीटर

ΔABC या काटकोन त्रिकोणामध्ये,

sin 60° = `"AB"/"AC"`  .......[व्याख्येप्रमाणे]

∴ `sqrt3/2 = 60/"AC"`

∴ AC = `(60 xx 2)/sqrt3`

= `120/sqrt3`

= `120/sqrt3 xx sqrt3/sqrt3` ..........[छेदाचे परिमेयकरण करून]

= `(120sqrt3)/3`

∴ AC = `40sqrt3`

= 40 × 1.73 = 69.20 मीटर 

∴ दोऱ्याची लांबी 69.20 मीटर आहे.

shaalaa.com
0°, 30°, 45°, 60° आणि 90° मापाच्या कोनांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी.
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: त्रिकोणमिती - सरावसंच 6.2 [Page 137]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 त्रिकोणमिती
सरावसंच 6.2 | Q 6. | Page 137

RELATED QUESTIONS

वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60° चा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंधा यांमधील अंतर 20 मी असल्यास झाडाची उंची काढा.


आकाशात उडत असलेल्या विमानाच्या चालकाने विमानतळावर विमान उतरविण्यास सुरूवात करताना 20° मापाचा अवनत कोन केला, तेव्हा विमानाचा सरासरी वेग ताशी 200 किमी होता. ते विमान 54 सेकंदांत विमान तळावर उतरले. विमान तळावर उतरण्यास वळण्याच्या क्षणी ते विमान जमिनीपासून किती उंचीवर होते? (sin 20° ≈ 0.342)


खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

sin θ = `1/2` तर θ = ?


`(1 - tan^2 45^circ)/(1 + tan^2 45^circ)` = ?


जर tan θ = 1, तर sin θ. cos θ = ?


जर cot (90 – A) = 1, तर ∠A = ?


जर cos (45° + x) = sin 30°, तर x = ?


जर sin 3A = cos 6A, तर ∠A = ?


tan 7° . tan 23° . tan 60° . tan 67° . tan 83° = `sqrt(3)` हे दाखवा.


2tan45° – 2sin30° ची किंमत ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×