Advertisements
Advertisements
Question
भिंगासाठी वापरले जाणारे कार्टेशिअन चिन्ह संकेत लिहा.
Long Answer
Advertisements
Solution
कार्देशिअन चिन्ह संकेतानुसार भिंगाचा प्रकाशीय मध्य (O) हा आरंभ बिंदू मानतात. मुख्य अक्ष हा संदर्भचौकटीचा (Frame of reference) X-अक्ष घेतात. चिन्ह संकेत पुढीलप्रमाणे आहेत.
- वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात.
- मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून मोजतात.
- प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात, तर डावीकडे मोजलेली सर्व अंतरे ऋण मानतात.
- मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे (ऊर्ध्व अंतरे) धन असतात.
- मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे (अधो अंतरे) ऋण असतात.
- बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असते आणि अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
