Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
Advertisements
Solution
- वाहतूक व दळणवळणांच्या सोयींचा विकास हा कुठल्याही देशाच्या समतोल आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची एक मूलभूत गरज असते.
- वाहतूक व्यवस्था ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची असते. वाहतुकीमुळे प्रवाशांची ने-आण, मालाची वाहतूक करता येते.
- रस्ते व रेल्वे वाहतुकीने दूरवरील ठिकाणे जोडली जातात.
- जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने जलमार्गाचा उपयोग होतो.
- हवाईमार्गही आंतरराष्ट्रीय व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
- परिणामी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालांच्या वाहतुकीमुळे परकीय चलन मिळण्यास मदत होते. हे देशाच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरते.
- एकंदरीत, देशातील वाहतुकीमुळे आर्थिक उलाढाली व सांस्कृतिक देवाणघेवाण जलद गतीने होत असल्याने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
RELATED QUESTIONS
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग | (i) पर्यटन स्थळ |
| (आ) रस्ते वाहतूक | (ii) भारतातील रेल्वेस्थानक |
| (इ) रिओ दी जनेरिओ | (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग |
| (ई) मनमाड | (iv) प्रमुख रस्ते मार्ग |
| (v) ४०° पश्चिम रेखावृत्त |
भौगोलिक कारणे लिहा.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.
फरक स्पष्ट करा.
भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ
टिपा लिहा.
भारतातील हवाई वाहतूक
टिपा लिहा.
प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक
टिपा लिहा.
प्रमाणवेळेची उपयोगिता
भारतात ______ राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे.
वाहतुकीचा सर्वांत महागडा मार्ग कोणता?
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-
- वरील नकाशा काय दर्शवतो?
- उत्तर-दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडला आहे?
- पूर्व किनऱ्यावरील प्रमुख दोन बंदरांची नावे लिहा.
- भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत दक्षिणेकडील बंदर कोणते?
- महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर.
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्नः
- वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
- कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
- पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
- पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
- कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.
