English

आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?

Advertisements
Advertisements

Question

आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?

Short/Brief Note
Advertisements

Solution

आकाशवाणीसाठी इतिहास हा पुढील बाबींसंदर्भात महत्त्वाचा असतो.

  1. १५ ऑगस्ट १९४७ किंवा त्या नंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात उपलब्ध आहेत. त्याचा समकालीन परिस्थिती जाणून घेण्यासाठी उपयोग होतो.
  2. राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस १, २५, ५० किंवा १०० किंवा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्षे पूर्ण होत असल्यास अशा विशेष प्रसंगी त्याची चर्चा करण्याकरता त्या घटनेची पार्श्वभूमी माहीत असावी लागते.यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांना आमंत्रित केले जाते.
  3. आकाशवाणीवरील 'दिनविशेष' कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी किंवा राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो.

अशारीतीने, आकाशवाणीसाठी ऐतिहासिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाकरता इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - लांब उत्तरे २

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
लांब उत्तरे २ | Q ५. ४.

RELATED QUESTIONS

दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

आकाशवाणी: स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस’ (आयएसबीएस) असे नामकरण केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे झाले.
   भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. ‘विविधभारती’ या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्येकार्यक्रम र्य सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदा., रेडिओ मिर्ची.

  1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?
  2. IBC चे नामकरण काय झाले?
  3. विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर हाेतात?
  4. आकाशवाणी हे नाव कसे पडले?

संकल्पनाचित्र तयार करा.

  वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन
सुरुवात/ पार्श्वभूमी      
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप      
कार्ये      

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 


कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

  आकाशवाणी दूरदर्शन
पार्श्वभूमी ______ ______
कार्य ______ ______

आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.


बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.


आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. 


मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.


आकाशवाणीचा इतिहास लिहा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×