Advertisements
Advertisements
Question
एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.
Advertisements
Solution
समजा, R1, R2, R3, R4, R5 ही 5 लाल पेनं, B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8 ही आठ निळी पेनं आणि G1, G2, G3 ही तीन हिरवी पेनं आहेत.
∴ नमुना अवकाश
S = {R1, R2, R3, R4, R5, B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8, G1, G2, G3}
∴ n(S) = 16
समजा, घटना A: ऋतुजाने काढलेले पेन निळे असणे.
∴ A = {B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8}
∴ n(A) = 8
∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S")) = 8/16`
∴ P(A) = `1/2`
∴ ऋतुजाने काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता `1/2` आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ______ आहे.
एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर तिकिटावरची संख्या ही सम संख्या असणे.
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरची संख्या 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता ______ असेल.
जर n(A) = 2, P(A) = `1/5`, तर n(S) = ?
बास्केटबॉल खेळाडू जॉन, वासिम व आकाश एका ठरावीक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता `4/5`, वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे, तर कोणाची संभाव्यता सर्वांत जास्त आहे?
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
गोलरक्षक हा संघनायक असणे.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे.
खालील कृती करा.
नमुना अवकाश स्वत: ठरवून खालील चौकटी भरा.
| नमुना अवकाश | घटना A साठी अट 'सम संख्या मिळणे' ही आहे. |
| ↓ | ↓ |
| S = { } | A = { } |
| ↓ | ↓ |
| n(S) = _____ | n(A) = _____ |
P(A) = `square/square = square`
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
घटना A : काढलेला पत्ता एक्का मिळणे.
घटना B : काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे.
कृती:
समजा, नमुना अवकाश 'S' आहे.
∴ n(S) = 52
घटना A : काढलेला पत्ता एक्का मिळणे.
∴ n(A) = `square`
∴ P(A) = `square` ...........(सूत्र)
∴ P(A) = `square/52`
∴ P(A) = `square/13`
घटना B : काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे.
∴ n(B) = `square`
P(B) = `("n"("B"))/("n"("S"))`
∴ P(B) = `square/4`
