Advertisements
Chapters
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - उष्णता Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - उष्णता - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 5: उष्णता
Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 उष्णता स्वाध्याय [Pages 71 - 72]
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला ______ म्हणतात.
समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांस समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या ______ गुणधर्मामुळे समान नसते.
पदार्थाचे द्रवातून स्थायूत रुपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा ______.
खालील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे ते स्पष्ट करा. पाण्याच्या या प्रकारच्या आचरणास काय म्हणतात?

विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळी असते हे प्रयोगाच्या साहाय्याने कसे सिद्ध कराल?
उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमान खंड निवडतात? का?
खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.

स्पष्टीकरण लिहा.
थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा.
शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साहाय्याने करा.
‘पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्याचे तुकडे होतात’ हे वाक्य स्पष्ट करा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अप्रकट उष्मा म्हणजे काय? पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील?
पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात?
पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा.
हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल?
खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली (System) वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणाली मधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही अशा स्थितीत आपणांस खालील तत्त्व मिळते.
उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्त्व म्हणतात.
अ. उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते?
आ. अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो?
इ. ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल?
ई. या तत्वाचा उपयोग पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो?
उदाहरणे सोडवा.
1 g वस्तुमानाचे दोन पदार्थ अ आणि ब यांना एकसारखी उष्णता दिल्यावर अ चे तापमान 3°C ने तर ब चे तापमान 5°C ने वाढवले यावरून अ व ब पैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे? किती पटीने?
बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? (द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g)
एका उष्णतारोधक भांड्यामध्ये 150 g वस्तुमानाचा 0°C तापमानाचा बर्फ ठेवला आहे. 100°C तापमानाची किती ग्रॅम पाण्याची वाफ त्यात मिसळावी म्हणजे 50°C तापमानाचे पाणी तयार होईल? (बर्फ वितळण्याचा अप्रकट उष्मा = 80 cal/g, पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 540 cal/g, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता = 1 cal/g)
एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?
Solutions for 5: उष्णता
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - उष्णता Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - उष्णता - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - उष्णता
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 5 (उष्णता) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 उष्णता are अप्रकट उष्मा (latent heat), पुनर्हिमायन (Regelation), पाण्याचे असंगत आचरण (Anomalous behaviour of water ), दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Due point and Humidity), उष्णतेचे एकक (Unit of heat), विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity), विशिष्ट उष्माधारकतेचे मापन (मिश्रण पद्धती) व कॅलरीमापी.
Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उष्णता exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 5, उष्णता विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
