Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील तक्ता पूर्ण करा.
| आकाशवाणी | दूरदर्शन | |
| पार्श्वभूमी | ______ | ______ |
| कार्य | ______ | ______ |
Advertisements
उत्तर
| आकाशवाणी | दूरदर्शन | |
| पार्श्वभूमी |
१. १९२४ मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने (आयबीसी) खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. २. २३ जुलै १९२७ या दिवशी भारतातील पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित करण्यात आले. ३. त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. ४. ब्रिटिश शासनाने आयबीसी' या कंपनीचे नामकरण 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस' ('आयएसबीएस') असे केले. ५. ८ जून १९३६ रोजी ISBC चे नामकरण 'ऑल इंडिया रेडिओ' (‘AIR’) असे झाले. ६. प्रसिद्ध कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ऑल इंडिया रेडिओला 'आकाशवाणी' हे नाव देण्यात आले |
१. १५ सप्टेंबर १९५९ या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते 'दिल्ली दूरदर्शन केंद्रा'चे उद्घाटन झाले. २. १५ ऑगस्ट १९८२ रोजी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. ३. १९९१ मध्ये केबल तंत्राच्या माध्यमाद्वारे परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना परवानगी मिळाली. |
| कार्य |
१. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणे, तसेच मनोरंजन, प्रबोधन करणे. २. 'विविध भारती' या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे शेतकरी, कामगार, युवक, स्त्रिया यांना उपयुक्ततापूर्ण मार्गदर्शन करणे. |
१. वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला 'प्रत्यक्ष काय घडले' हे दाखवणे. २. स्थानिक, देश-विदेशांतल्या घडामोडींची माहिती देणे. ३. घरबसल्या इतिहास व भूगोलासंदर्भात जगाची ओळख करून देणे. ४. करमणूक करणे. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.

मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा.
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?
आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.
कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:
