हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील तक्ता पूर्ण करा. आकाशवाणी दूरदर्शन पार्श्वभूमी ______ ______ कार्य ______ ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील तक्ता पूर्ण करा.

  आकाशवाणी दूरदर्शन
पार्श्वभूमी ______ ______
कार्य ______ ______
सारिणी
Advertisements

उत्तर

  आकाशवाणी दूरदर्शन
पार्श्वभूमी

१. १९२४ मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने (आयबीसी) खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले.

२. २३ जुलै १९२७ या दिवशी भारतातील पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित करण्यात आले.

३. त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या.

४. ब्रिटिश शासनाने आयबीसी' या कंपनीचे नामकरण 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस' ('आयएसबीएस') असे केले.

५. ८ जून १९३६ रोजी ISBC चे नामकरण 'ऑल इंडिया रेडिओ' (‘AIR’) असे झाले.

६. प्रसिद्ध कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ऑल इंडिया रेडिओला 'आकाशवाणी' हे नाव देण्यात आले

१. १५ सप्टेंबर १९५९ या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते 'दिल्ली दूरदर्शन केंद्रा'चे उद्घाटन झाले.

२. १५ ऑगस्ट १९८२ रोजी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले.

३. १९९१ मध्ये केबल तंत्राच्या माध्यमाद्वारे परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना परवानगी मिळाली.

कार्य

१. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणे, तसेच मनोरंजन, प्रबोधन करणे.

२. 'विविध भारती' या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे शेतकरी, कामगार, युवक, स्त्रिया यांना उपयुक्ततापूर्ण मार्गदर्शन करणे.

१. वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला 'प्रत्यक्ष काय घडले' हे दाखवणे.

२. स्थानिक, देश-विदेशांतल्या घडामोडींची माहिती देणे.

३. घरबसल्या इतिहास व भूगोलासंदर्भात जगाची ओळख करून देणे. 

४. करमणूक करणे.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - खूप छोटी उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
खूप छोटी उत्तरे | Q २. (अ) ३.

संबंधित प्रश्न

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.


दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

आकाशवाणी: स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस’ (आयएसबीएस) असे नामकरण केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे झाले.
   भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. ‘विविधभारती’ या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्येकार्यक्रम र्य सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदा., रेडिओ मिर्ची.

  1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?
  2. IBC चे नामकरण काय झाले?
  3. विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर हाेतात?
  4. आकाशवाणी हे नाव कसे पडले?

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 


कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.


आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.


बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.


कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.


आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. 


पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.


आकाशवाणीचा इतिहास लिहा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×