Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
१. विद्यार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी-
- चांगले साहित्य वाचणे
- योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणे
- योग्य ठिकाणी खर्च करणे
- आवश्यक तेवढेच बोलणे
- नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणे
२. स्वप्रयत्नांच्या बळावर, चांगल्या सवयी असणारी व्यक्ती समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करते आणि स्वत: निवडलेल्या क्षेत्रात हमखास यश मिळवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन होय.
गणिताची प्रचंड आवड असणाऱ्या रामानुजन यांना शालेय जीवनापासूनच गणिते सोडवणे व विविध गणिती सूत्रांच्या अभ्यासातून नवीन सूत्रे बनवण्याची सवय लागली होती. त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी गणितच असे. कदाचित म्हणूनच, रामानुजन झोपेतून जागे झाल्यावर अचानक अवघड सूत्रे लिहून काढत. आपल्याला प्रा. हार्डी या नामवंत गणितज्ज्ञाचे मार्गदर्शन मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रा. हार्डींशी पत्रव्यवहार करून आपली ही इच्छा प्रदर्शित केली, कठोर मेहनत घेतली. त्यांच्यासारख्या असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या मेहनती मुलाला प्रा. हार्डींचे मार्गदर्शन मिळालेच शिवाय इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. या तीन वर्षांच्या काळात त्यांनी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांना रॉयल सोसायटीसारख्या सन्माननीय संस्थेचे सदस्यत्व बहाल केले गेले.
वरील उदाहरणावरून, चांगल्या सवयी व स्वप्रयत्न यांमुळे व्यक्तिमत्त्व घडते हे स्पष्ट होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
गुणवैशिष्ट्ये लिहा.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
सहसंबंध शोधा.
सावध : बेसावध : : विश्वासू : ______
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.

वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
सूचनेप्रमाणे कृती करा.
वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
चौकट पूर्ण करा.

पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
