मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, x आणि y अशा संख्या आहेत, की x > y

∴ दिलेल्या अटीनुसार, दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे.

x2 - y2 = 120    .....(i)

दुसऱ्या अटीनुसार, लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे.

y2 = 2x    .....(ii)

y2 = 2x ही किंमत समीकरण (i) मध्ये भरून,

x2 - 2x = 120

∴ x2 - 2x - 120 = 0

∴ x2 - 12x + 10x - 120 = 0 ....`[(-120 = -12; 10),(-12xx 10 = - 120),(- 12 + 10 = - 2)]`

∴ x(x - 12) + 10(x - 12) = 0

∴ (x - 12)(x + 10) = 0 

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

∴ x - 12 = 0  किंवा x + 10 = 0

∴ x = 12  किंवा  x = - 10

जर x = - 10

तर, y2 = 2x = 2(- 10) = - 20

परंतु, कोणत्याही संख्येचा वर्ग शून्य असू शकत नाही.

∴ x = 12

लहान संख्या = y2 = 2x

∴ y2 = 2 × 12

∴ y2 = 24

∴ y = `+- sqrt24`   ....[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

∴ लहान संख्या `sqrt24` व मोठी संख्या 12 किंवा लहान संख्या `- sqrt24` व मोठी संख्या 12 या आहेत.

shaalaa.com
वर्गसमीकरणाचे उपयोजन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 वर्गसमीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 12. | पृष्ठ ५४

संबंधित प्रश्‍न

दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.


विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज `1/6` आहे, तर त्यांची आजची वये काढा.


श्री. मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील, तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? खालील प्रवाहआकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा.


एका नदीत, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.


समलंब मध्ये `square`ABCD मध्ये AB || CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौसेमी आहे, तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा.

उकल:

`square`ABCD समलंब चौकोन आहे. AB || CD

`"A"(square "ABCD") = 1/2 xx ("AB" + "CD") xx square`

∴ `33 = 1/2(x + 2x + 1) xx square`

∴ `square` = (3x + 1) × `square`

∴ 3x+ `square` - `square` = 0

∴ 3x (____) + 10 (____) = 0 

∴ (3x + 10)(_____) = 0

∴ (3x + 10) = 0  किंवा  `square` = 0

∴ x = `- 10/3` किंवा x = `square`

परंतु, लांबी ऋण नसते.

∴ `x ne (- 10)/3`   ∴  x = `square`

AB = ______, CD = ______, AD = BC = _______


मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती?


एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने 2 तासांत पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो, तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो?


खालील शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा.

दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.

कृती: पहिली सम नैसर्गिक संख्या x मानू.

दुसरी क्रमागत सम नैसर्गिक संख्या = (______)

दिलेल्या अटीनुसार,

x2 + (x + 2)2 = 244 

x2 + x2 + 4x + 4 – (______) = 0

2x2 + 4x – 240 = 0

x2 + 2x – 120 = 0

x2 + (______) – (______) – 120 = 0

x (x + 12) – (______) (x + 12) = 0 

(x + 12) (x – 10) = 0

x = (______) / x = 10

परंतु, नैसर्गिक संख्या ऋण नसते, म्हणून x = -12 शक्य नाही.

म्हणून, पहिली नैसर्गिक संख्या x = 10 असेल.

म्हणून, दुसरी नैसर्गिक संख्या = x + 2 = 10 + 2 = 12 असेल.


मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 22 असल्यास त्यांची आजची वये काढा.


एका बागेत 200 झाडे असून प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या ओळीच्या संख्येपेक्षा 10 ने जास्त आहे, तर प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×