मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 22 असल्यास त्यांची आजची वये काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 22 असल्यास त्यांची आजची वये काढा.

संख्यात्मक
Advertisements

उत्तर

समजा, मनिषचे आजचे वय x वर्षे आहे.

मनीषच्या आईचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे.

∴ मनीषच्या आईचे आजचे वय (5x + 1) वर्षे आहे.

4 वर्षांपूर्वी,

मनीषचे वय (x – 4) वर्षे होते आणि

मनीषच्या आईचे वय (5x + 1 - 4) वर्षे म्हणजेच, (5x - 3) वर्षे होते.

दिलेल्या अटीनुसार,

4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 22 होता.

∴ (x – 4) (5x – 3) = 22  

∴ 5x2 – 3x – 20x + 12 – 22 = 0        

5 × (–10) = –50
        |   |
    -25 +2
(–25) × 2 = –50
–25 + 2 = –23

∴ 5x2 – 23x – 10 = 0                               

∴ 5x2 – 25x + 2x – 10 = 0

∴ 5x (x – 5) + 2(x – 5) = 0

∴ (x – 5) (5x + 2) = 0 

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते या गुणधर्माचा उपयोग करून,

x – 5 = 0 किंवा 5x + 2 = 0

∴ x = 5 किंवा x = `(-2)/5`

परंतु, वय ऋण असू शकत नाही.

∴ x = 5

∴ मनीषचे आजचे वय = x = 5 वर्षे आहे.

मनीषच्या आईचे आजचे वय = 5x + 1

= 5(5) + 1

= 25 + 1 = 26 वर्षे आहे.

shaalaa.com
वर्गसमीकरणाचे उपयोजन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - Q ४)

संबंधित प्रश्‍न

प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.


दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.


विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज `1/6` आहे, तर त्यांची आजची वये काढा.


श्री. कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठरावीक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य, तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक ₹ 40 असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मितीमूल्य ₹ ६०० असेल, तर प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा.


पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा ६ दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ४ दिवस लागतात, तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील?


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती?


दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा.


रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असते, तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती, तर विद्यार्थ्यांची संख्या काढा.


तळवेल येथील शेतकरी श्री. दिनेश यांच्या आयताकृती शेतीची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या `1/3` पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते, तर त्या शेताची लांबी आणि रुंदी, तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा.


एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने 2 तासांत पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो, तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×