Advertisements
Advertisements
प्रश्न
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
Advertisements
उत्तर
'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' अशी प्रार्थना केली जाते. आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे. कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल, तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भारस्वरूप असतो. रोगी माणसाला सुख, समाधान मिळू शकत नाही. त्याने कमावलेले सारे धन त्याच्या आजारपणातच वाया जाते. म्हणूनच, शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणेच जास्त योग्य आहे. निरोगी शरीरसंपदेच्या बळावर आपण कितीही धन कमावू शकतो. आपले जीवन सुखी, समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच उत्तम आरोग्य होय, म्हणूनच 'आरोग्यम् धनसंपदा' असे म्हटले जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)

चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वीज चमकणे |
'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पेरणीसाठी लागणारे बियाणे
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पाराबती करते त्या दोन कृती-
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
| वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.
