Please select a subject first
Advertisements
Advertisements
100 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. जर दलालीचा दर 2% असेल, तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा.
Concept: शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर
10 रुपये दर्शनी किंमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर:
- एकूण गुंतवणूक किती?
- मिळालेला लाभांश किती?
- गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा.
Concept: शेअर्सवरील परताव्याचा दर
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर नमुना अवकाश लिहा.
Concept: नमुना अवकाश
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनांची संभाव्यता काढा.
- ती संख्या विषम असेल.
- ती संख्या 5 च्या पटीत असेल.
Concept: घटनेची संभाव्यता
जर n(A) = 2, P(A) = `1/5`, तर n(S) = ?
Concept: घटनेची संभाव्यता
एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.
Concept: घटनेची संभाव्यता
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.
Concept: घटनेची संभाव्यता
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.
Concept: घटनेची संभाव्यता
खालील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही?
Concept: संभाव्यता: ओळख
एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करून लिहा.
कृती:
एक फासा टाकला असता नमुना अवकाश 'S' आहे.
S = `{square}`
∴ n(S) = 6
घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.
A = `{square}`
∴ n(A) = 3
∴ P(A) = `square/("n"("S"))` ............(सूत्र)
∴ P(A) = `square`
Concept: घटनेची संभाव्यता
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
घटना A : काढलेला पत्ता एक्का मिळणे.
घटना B : काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे.
कृती:
समजा, नमुना अवकाश 'S' आहे.
∴ n(S) = 52
घटना A : काढलेला पत्ता एक्का मिळणे.
∴ n(A) = `square`
∴ P(A) = `square` ...........(सूत्र)
∴ P(A) = `square/52`
∴ P(A) = `square/13`
घटना B : काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे.
∴ n(B) = `square`
P(B) = `("n"("B"))/("n"("S"))`
∴ P(B) = `square/4`
Concept: घटनेची संभाव्यता
एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2 : 5, आहे, तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा.
Concept: घटनेची संभाव्यता
दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
- दोन मुलांची समिती = {`square`}
- दोन मुलींची समिती = {`square`}
- एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = {B1G1, B1G2, `square`, `square`}
-
∴ नमुना अवकाश (S) = {(B1B2), (B1G1), `square`, `square`, (B2G2), (G1G2)}
Concept: नमुना अवकाश
दोन नाणी एकाच वेळी फेकणे. या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना A व B संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण कराः
घटना A: कमीत कमी एक छाप मिळणे.
घटना B: एकही छाप न मिळणे.
कृती:
दोन नाणी एकाच वेळी फेकली असताना नमुना अवकाश ‘S’ आहे.
S = {`square`, HT, TH, `square`}
घटना A: कमीत कमी एक छाप मिळणे.
∴ A = {`square`, HT, TH}
घटना B: एकही छाप न मिळणे.
∴ B = {`square`}
Concept: नमुना अवकाश
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा.
Concept: घटनेची संभाव्यता
एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा:
घटना A: छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे.
घटना B: काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे.
Concept: घटनेची संभाव्यता
एका महामार्गावरील टोलनाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर (रुपयांत) व वाहनसंख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे 'गृहीतमध्य' पद्धतीने मध्य काढा.
| जमा कर (₹) | 300 − 400 | 400 − 500 | 500 − 600 | 600 − 700 | 700 − 800 |
| वाहन संख्या | 80 | 110 | 120 | 70 | 40 |
Concept: वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्य (Mean from grouped frequency distribution) >> सरळ पद्धती
एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा.
| आंब्यांची संख्या | 50 − 100 | 100 − 150 | 150 − 200 | 200 − 250 | 250 − 300 |
| झाडांची संख्या | 33 | 30 | 90 | 80 | 17 |
Concept: वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्यक
पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा.
| विद्यार्थ्यांची उंची (सेमी.) | 135 - 140 | 140 - 145 | 145 - 150 | 150 - 155 |
| विद्यार्थी संख्या | 4 | 12 | 16 | 8 |
Concept: आयतालेख
