Please select a subject first
Advertisements
Advertisements
जर अंकगणिती श्रेढीत पहिले पद 6 आहे व सामान्य फरक -3 आहे, तर तिचे दुसरे व तिसरे पद लिहा.
Concept: अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
खालील अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा.
7, 13, 19, 25, ............
कृती:
दिलेली अंकगणिती श्रेढी: 7, 13, 19, 25, .........
पहिले पद a = 7; t19 = ?
tn = a + `(square)`d ..............(सूत्र)
∴ t19 = 7 + (19 - 1) `square`
∴ t19 = 7 + `square`
∴ t19 = `square`
Concept: अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
पहिल्या 'n' सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा.
Concept: अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
एका नाटयगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे, तर नाटयगृहात एकूण किती खुर्च्या असतील?
Concept: अंकगणिती श्रेढी
मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघांची आजची वये काढा.
Concept: अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे अंकगणिती श्रेढरीमध्ये आहेत. सर्वांत लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या पाचपट आहे, तर त्या त्रिकोणाच्या तीनही कोनांची मापे काढा. (त्रिकोणाच्या कोनांची मापे a, a + d, a + 2d घ्या.)
Concept: अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर tn = ______.
Concept: अंकगणिती श्रेढी
ज्या अंकगणिती श्रेढीत पहिले पद p आहे, दुसरे पद q आहे आणि शेवटचे पद r आहे तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज `(q + r - 2p) xx (p + r)/(2(q - p))` एवढी आहे हे दाखवा.
Concept: अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे t7 = 4, व d = −4 तर a = _____.
Concept: अंकगणिती श्रेढी
कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये व तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती?
Concept: अंकगणिती श्रेढीचे उपयोजन (Applications of A. P.)
tn = 3n − 2 या क्रमिकचे पहिले पद काढा.
Concept: क्रमिकेतील पदे
एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल?
Concept: जीएसटी ओळख
एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?
Concept: शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.
Concept: व्यवसाय साखळीतील जी.एस.टी.
GSTIN मध्ये एकूण ______ अंकाक्षरे असतात.
Concept: व्यवसाय साखळीतील जी.एस.टी.
एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती?
Concept: जीएसटी ओळख
खालील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा:
| अनुक्रमांक | दर्शनी किंमत | मूल्यप्रकार | बाजारभाव |
| 1. | ₹ 100 | सममूल्य | `square` |
| 2. | `square` | अधिमूल्य ₹ 500 | ₹ 575 |
| 3. | ₹ 10 | `square` | ₹ 5 |
| 4. | ₹ 200 | अवमूल्य ₹ 50 | `square` |
Concept: शेअर्स
कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण 590 रुपये घेतले. त्यात 500 रुपये करपात्र किंमतीवर, केंद्राचा कर 45 रुपये व राज्याचा कर 45 रुपये आहे, तर या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवा कराचा दर काढा.
Concept: जीएसटी ओळख
दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरून सेवाबीजक पूर्ण करा.
| सेवा पुरवल्याचा टॅक्स इन्व्हॉइस (नमुना) | ||||||||
| आहार सोनेरी, खेड शिवापूर, पुणे | Invoice no. 58 | |||||||
| Mob no. 7588580000, email - [email protected] | ||||||||
| GSTIN: 27AAAAA5555B1ZA | Invoice Date: 25 Feb., 2020 | |||||||
| SAC | Food items |
Qty | Rate (in ₹) |
Taxable amount |
CGST | SGST | ||
| 9963 | Coffee | 1 | 20 | 20.00 | 2.5% | ₹ 0.50 | 2.5% | `square` |
| 9963 | Masala Tea | 1 | 10 | 10.00 | `square` | ₹ 0.25 | 2.5% | `square` |
| 9963 | Masala Dosa | 2 | 60 | `square` | 2.5% | `square` | 2.5% | ₹ 3.00 |
| Total | 150.00 | `square` | ₹ 3.75 | |||||
| Grand Total = ₹ 157.50 | ||||||||
Concept: करबीजक
खेळण्यातील एका रिमोट कन्ट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 2360 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:
कृती:
कारची विक्री किंमत (जीएसटीसह) = 2360 रुपये
जीएसटी दर = 18%
समजा कारची करपात्र किंमत x रुपये आहे.
∴ जीएसटी = `18/100 xx x`
खेळण्यातील कारची विक्री किंमत = करपात्र किंमत + `square` .......(सूत्र)
∴ 2360 = `square + square/100 xx x`
∴ 2360 = `square/100 xx x`
∴ 2360 × 100 = 118x
∴ `x = (2360 xx 100)/square`
∴ कारची करपात्र किंमत `square` रुपये आहे.
Concept: करबीजक
