हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिकांतील अंतर किती हे सकारण लिहा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिकांतील अंतर किती हे सकारण लिहा.

योग
Advertisements

उत्तर

समजा, रेषा PQ व RS या वर्तुळाच्या स्पर्शिका असून त्या एकमेकींना समांतर आहेत व वर्तुळाला अनुक्रमे M व N या बिंदूंवर स्पर्श करतात.
केंद्र O मधून रेषा RS ला समांतर रेषा AB काढा.

OM = ON = 4.5 ....[पक्ष]

रेषा AB || रेषा RS ....... [रचना]

रेषा PQ || रेषा RS ......[पक्ष]

∴ रेषा AB || रेषा PQ || रेषा RS

आता, ∠OMP = ∠ONR = 90° ......(i) [स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]

रेषा PQ || रेषा AB साठी,

∠OMP = ∠AON = 90° ......(ii) [संगत कोन व (i) वरून]

रेषा RS || रेषा AB साठी,

∠ONR = ∠AOM = 90° .....(iii) [संगत कोन व (i) वरून]

∠AON = ∠AOM = 90° + 90° ....[(ii) व (iii) वरून]

∴ ∠AON + ∠AOM = 180°

∴ ∠AON व ∠AOM एकरेषीय जोडी आहेत.

∴ किरण OM व किरण ON हे विरुद्ध किरण आहेत.

∴ बिंदू M, O, N एकरेषीय आहेत. .......(iv)

∴ MN = OM + ON .........[M-O-N, (iv) वरून]

∴ MN = 4.5 + 4.5

∴ MN = 9 सेमी

∴ PQ व RS या दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर 9 सेमी आहे.

shaalaa.com
स्पर्शिका - त्रिज्या प्रमेय
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: वर्तुळ - सरावसंच 3.1 [पृष्ठ ५५]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 वर्तुळ
सरावसंच 3.1 | Q 4. | पृष्ठ ५५

संबंधित प्रश्न

एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 12 सेमी आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेमी आहे?


बिंदू O केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा l बिंदू P मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असेल, तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(1) d(O, P) = किती? का?

(2) जर d(O, Q) = 8 सेमी असेल. तर बिंदू Q चे स्थान कोठे असेल?

(3) d(O, R)=15 सेमी असेल तर बिंदू R ची किती स्थाने रेषा l वर असतील? ते बिंदू P किती अंतरावर असतील?


शेजारील आकृतीत, रेषा l ही केंद्र O असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. बिंदू Q हा त्रिज्या OP चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q ला सामावणारी जीवा RS || रेषा l. जर RS 12 सेमी असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. 


शेजारील आकृतीत, रेषा l ही केंद्र O असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. बिंदू Q हा त्रिज्या OP चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q ला सामावणारी जीवा RS || रेषा l. जर RS 12 सेमी असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. 


आकृती मध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळाचा रेख AB हा व्यास आहे. वर्तुळाची स्पर्शिका PQ वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. रेख AP ⊥ रेषा PQ आणि रेख BQ ⊥ रेषा PQ. तर सिद्ध करा - रेख CP ≅ रेख CQ. 

 


सोबतच्या आकृतीमध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळात रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते, तर ∠CAB चे माप किती अंश आहे? का? 

 


आकृतीत रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत, तर रेख OR हा ∠MRN आणि ∠MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे, हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

सिद्धता:

ΔRMO आणि ΔRNO यांमध्ये,

∠RMO ≅ ∠RNO = 90° ...............[`square`]

कर्ण OR ≅ कर्ण OR …..............[`square`]

बाजू OM ≅ बाजू [`square`]  ..........…[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ ΔRMO ≅ ΔRNO ….......[`square`]

∠MOR ≅ ∠NOR

तसेच, ∠MRO ≅ [`square`] ......................[`square`]

∴ रेख OR ∠MRN आणि ∠MON या दोन्ही कोनांची दुभाजक आहे.


खालील प्रमेय सिद्ध करा:

वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात.


'O' केंद्र असलेल्या वर्तुळाला P या बाह्यबिंदूतून AP ही A बिंदूपाशी स्पर्शिका काढली आहे. जर OP = 12 सेमी व ∠OPA = 30°, तर वर्तुळाची त्रिज्या ______ असेल.


वरील आकृतीत, C केंद्र असलेल्या वर्तुळाला A या बाह्यबिंदूतून AB आणि AD हे स्पर्शिकाखंड काढले आहेत. तर सिद्ध करा:

∠A = `1/2` [m(कंस BYD) - m(कंस BXD)]


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×